नाशिक, 20 फेब्रुवारी : घरगुती गॅस सिलेंडरच्या झालेल्या स्फोटात कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील धाऊर इथं ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये पती,पत्नी, मुलासह पुतण्याचा समावेश आहे.
रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. गॅस सिलेंडरमधून गळती सुरु होती मात्र ते कुणाच्याही लक्षात आले नाही. चौधरी कुटुंबातील सदस्य रात्री जेवण करून झोपले. घरात दिवा सुरु असल्यामुळे सिलेंडरने पेट घेताच काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले.
या दुर्घटनेत मुरलीधर चौधरी, कविता चौधरी, तुषार मुरलीधर चौधरी( वय १०), नयन कैलास चौधरी( वय ८)अशा चौघांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील चौघांचा असा करूण अंत झाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, गॅस सिलेंडरची योग्य काळजी न घेतल्याने स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी याबाबत योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
VIDEO : राहु दे, धनंजय मुंडेंनी चहाचे दिले चक्क 2000 रुपये!