मनोहर पर्रिकरांची प्रकृती आणखी खालावली, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

मनोहर पर्रिकरांची प्रकृती आणखी खालावली, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

सध्या घरीच उपचार घेत असलेल्या मनोहर पर्रिकरांचा रक्तदाब खालावला आहे. त्यांच्या घरी गोवा मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांची मोठी टीम तैनात करण्यात आली आहे.

  • Share this:

गोवा, 14 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे. मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आणखी खालावली आहे अशी माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृतरित्या देण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री गेल्या वर्षभरापासून अन्नाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत.

सध्या घरीच उपचार घेत असलेल्या मनोहर पर्रिकरांचा रक्तदाब खालावला आहे. त्यांच्या घरी गोवा मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांची मोठी टीम तैनात करण्यात आली आहे. त्यांना सध्या ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही

पर्रिकरांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली होती. पण त्यासंदर्भात कोणतंही अधिकृत मेडिकल बुलेटिन देण्यात आलं नाही.

पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता कमी, भाजप आमदाराने दिली होती माहिती

गोव्याचे मुख्यमंत्री गेल्या वर्षभरापासून अन्नाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती ठीक व्हावी अशी प्रार्थना आम्ही करत आहोत मात्र त्यांची वाचण्याची शक्यता कमी असल्याचं गोव्याचे भाजप आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी म्हटलं होतं.

राज्यात काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. तर सत्ताबदलाबाबत बोलताना मायकल लोबो म्हणाले की, गोव्याच्या नेतृत्वात बदल होणार नाही. जोपर्यंत पर्रिकर आहेत तोपर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील. त्यांची जागा घेण्याचा दावा कोणीही करणार नाही. आम्ही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचं मायकल लोबो यांनी सांगितलं होतं. पर्रिकरांचं काही बरे वाईट झाल्यास भाजपचा पुढचा मुख्यमंत्री होईल असंही मायकल लोबो म्हणाले होते.

पर्रिकरांची प्रकृती खालावल्याने तात्काळ बैठक बोलावण्यात आली होती. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सध्या तीन मतदारसंघातील पोटनिवडणुका होणार असल्याने त्यासाठी बैठक झाली असं मायकल लोबो यांनी सांगितलं.

सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची हालचाल

गोव्यात काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहले आहे. राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने असा दावा केला आहे की भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. राज्यात सर्वाधिक आमदार काँग्रेस सोबत असल्याचे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी दिली पाहिजे. राज्यात राष्ट्रपतीशासन आणता येणार नाही. तर तसे प्रयत्न झाले तर त्याला आव्हान दिले जाऊ शकते असे देखील काँग्रेसचे म्हणणे आहे. 2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 17 जागांवर तर भाजपने 13 जागांवर विजय मिळवला होता. पण अन्य पक्षांना सोबत घेऊन भाजपने सत्ता मिळवली होती.

VIDEO: शरद पवारांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंची मोदींवर चौफेर टीका

 

 

First published: March 17, 2019, 7:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading