• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • पुण्यात गँगवारचा भडका, भर दिवसा वाळू व्यावसायिक आणि 5 जणांमध्ये गोळीबार; 2 ठार

पुण्यात गँगवारचा भडका, भर दिवसा वाळू व्यावसायिक आणि 5 जणांमध्ये गोळीबार; 2 ठार

हल्लोखोरांनी तीक्ष्ण हत्यारासह हल्ला चढवत गोळीबार केला. यात संतोष जगताप यांचा मृत्यू झाला आहे.

हल्लोखोरांनी तीक्ष्ण हत्यारासह हल्ला चढवत गोळीबार केला. यात संतोष जगताप यांचा मृत्यू झाला आहे.

हल्लोखोरांनी तीक्ष्ण हत्यारासह हल्ला चढवत गोळीबार केला. यात संतोष जगताप यांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:
पुणे, 22 ऑक्टोबर : पुणे (pune) जिल्ह्यातील उरळीकांचनमध्ये गँगवारमधून (gangwar) दिवसाढवळ्या गोळीबाराची (gun firing) घटना समोर आली आहे. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. भर रस्त्यावर घडलेल्या या थरारक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जुन्या वादातून लोणीकाळभोर (lonikalbhor) परिसरातील उरूळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराची ही घटना घडली आहे. या गोळीबारात संतोष जगताप (santosh jagatap) याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हॉटेल सोनईसमोर ही घटना घडली. तरुणीला पान खाताना पाहून शेजारील व्यक्तीचं Funny रिअ‍ॅक्शन; VIDEO तुफान Viral संतोष जगताप हा वाळू व्यावसायिक होता. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर चर्चा करत होते. त्याचवेळी तिथे पाच जणांनी संतोष जगताप यांच्यावर हल्ला चढवला. या हल्लोखोरांनी तीक्ष्ण हत्यारासह हल्ला चढवत गोळीबार केला. यात संतोष जगताप हे गंभीर जखमी झाले. त्यांचे अंगरक्षकही जखमी झाले. पण जखमी अवस्थेत संतोष जगताप यांनी हल्लेखोरांवर प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर हा ठार झाला तर बाकीचे हल्लेखोर पळून गेले आहे. संतोष जगताप आणि त्यांच्याजखमी अंगरक्षकांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु, उपचारापूर्वी संतोष जगताप यांचा मृत्यू झाला आहे.  दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहेत. YouTube वापरकर्त्यांना Google ने केले सावधान; यूटयुब अकाउंटस होतायत हॅक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पा लोंढे गँग आणि त्याच्या विरूद्ध असलेल्या एका टोळीमध्ये हे फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युद्ध भडकल्याची चर्चा सध्या आहे. संतोष जगताप याची सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.  राहू येथे बेकायदा वाळू उपश्यावरुन २०११ मध्ये तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत बंधू रमेश सोनवणे यांच्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप याच्यावर आहे. या प्रकरणात न्यायालयात जामीनावर संतोष जगताप बाहेर होता. त्यानंतर आता संतोष जगताप यांची सुद्धा भरदिवसा गोळीबार करून हत्या करण्यात आली.भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published: