मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नांदेडमध्ये गँगवारचा भडका, गुंडाच्या डोक्यात गोळी झाडली, नंतर तलवारीने केले सपासप वार!

नांदेडमध्ये गँगवारचा भडका, गुंडाच्या डोक्यात गोळी झाडली, नंतर तलवारीने केले सपासप वार!

आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याला काही अंतरावर गाठलं. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी विक्की ठाकूरच्या डोक्यात लागली.

आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याला काही अंतरावर गाठलं. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी विक्की ठाकूरच्या डोक्यात लागली.

आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याला काही अंतरावर गाठलं. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी विक्की ठाकूरच्या डोक्यात लागली.

नांदेड, 20 जुलै : नांदेड (nanded) शहरात गुन्हेगारी सत्र सुरूच आहे.  गँगवारमधून (Gangwar) एका गुंडाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी विक्की ठाकूर (Gangster Vicky Thakur shot dead) नामक गुंडाची हत्या केली आहे. तीन गोळ्या झाडून आरोपींनी विक्की ठाकुरला जखमी केले नंतर त्याच्यावर तलवारीने अनेक वार करून खून केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवारी रात्री आठच्या सुमारास नांदेड शहरातील गाडीपुरा भागात ही घटना घडली. या हत्येला गॅंगवार कारणीभूत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मयत विक्की ठाकूर हा देखील गुंड होता. त्यांच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. मयत गुंड विक्की ठाकूर काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता.

कॉमेंट्री करताना 'ब्राह्मण' कार्ड, सुरेश रैना सोशल मीडियावर ट्रोल

एका वर्षापूर्वी नांदेडमध्ये विक्की चव्हाण नामक गुंडाचा अशाच पद्धतीने खून करण्यात आला होता. कैलास बिगानिया नामक गुंडाने आपल्या अन्य साथीदारासह विक्की चव्हाणचा खून केला होता. विक्की ठाकूर हा विक्की चव्हाण याचा खास साथीदार होता. विक्की ठाकूर काही दिवसापूर्वी तुरुंगातून जामिनावर सुटला होता. मंगळवारी रात्री विक्की ठाकूर गाडीपुरा भागात आपल्या घराजवळ थांबला होता. तेव्हा दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. नेम चुकल्याने विक्की ठाकूर धावत सुटला.

मुलीच्या आईला धमकावून तरुणासोबत लावलं लग्न, परभणीतील घटना

त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याला काही अंतरावर गाठलं. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी विक्की ठाकूरच्या डोक्यात लागली आणि तो जागीच ठार झाला. नंतर आरोपींनी हवेत गोळीबार करून दहशत पसरवली. हे गुंड एवढ्यावरच थांबले नाही तर जमिनीवर पडलेल्या विक्की ठाकूरच्या शरीरावर आरोपींनी तलवारीने अनेक वार केले. विक्की ठाकूर मेल्याची खात्री झाल्यानंतर आरोपी पसार झाले.

या घटनेनंतर शहरभर वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहे. परिसरात एकच धावपळ उडाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहे. पंचनामा करून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कुख्यात गुंड कैलास बिगनीया याचा भाऊ नितीन बिगानीया, गंगाधर बोकारे यांच्यासह अन्य गुंडांनी विक्की ठाकूर याची हत्या केली असा पोलिसांचा संशय आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

First published:
top videos