'डॅडी' तुरुंगाबाहेर येणार.. शिवसेना नगरसेवकाच्‍या खूनप्रकरणी भोगतोय जन्मठेप

'डॅडी' तुरुंगाबाहेर येणार.. शिवसेना नगरसेवकाच्‍या खूनप्रकरणी भोगतोय जन्मठेप

अरुण गवळीने यापूर्वी पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी, मुलाचे लग्न, आईचा मृत्यू अशा प्रसंगी वेळोवेळी संचित रजा म्हणजेच फर्लो तर कधी अभिवचन रजा घेतल्या. यादरम्यान त्याने अटींचे उल्लंघन न करता तुरुंगात परतला आहे, असे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी कोर्टाला सांगितले.

  • Share this:

नागपूर/मुंबई, 23 एप्रिल- शिवसेनेच्‍या नगरसेवकाच्‍या खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या गॅंगस्टर अरुण गवळी ऊर्फ डॅडी लवकरच तुरुंगाबाहेर येणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळी याची 28 दिवसांच्या संचित (फर्लो) रजा मंजूर केली आहे. मुंबईत 29 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होत आहे. त्यानंतर म्हणजेच 30 एप्रिलपासून अरुण गवळीची रजा लागू करण्यात येईल, असे कोर्टाने म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये त्याने पुन्हा कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज करुन संचित रजा मिळण्याचा अर्ज केला होता. त्यानंतर उपमहानिरीक्षकांनी त्याचा अर्ज फेटाळला. तर यानंतर त्याने हायकोर्टात अर्ज केला.

अनुचित घटना घडण्याची शक्यता?

निवडणुकीच्या काळात अरुण गवळीला सुटी दिल्यास मुंबईत अनुचित घटना घडण्याची शक्यता व्यक्त करत सरकारने या रजेला विरोध केला होता. परंतु अरुण गवळीने यापूर्वी पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी, मुलाचे लग्न, आईचा मृत्यू अशा प्रसंगी वेळोवेळी संचित रजा म्हणजेच फर्लो तर कधी अभिवचन रजा घेतल्या. यादरम्यान त्याने अटींचे उल्लंघन न करता तुरुंगात परतला आहे, असे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी कोर्टाला सांगितले. त्यानंतर न्यायमूर्ती झका हक आणि न्या. विनय जोशी यांनी गवळीची रजा मंजूर केली.

अरुण गवळी भोगतोय जन्मठेपेची शिक्षा..

अरुण गवळी सध्या शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खूनप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

VIDEO : पंतप्रधान मोदी आपला पगार आईकडे देतात का? मुलाखतीत दिलं उत्तर

First published: April 24, 2019, 1:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading