सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद 29 जुलै : मराठवाड्यातील दुष्काळ नागरीकांचा पिच्छा सोडायला तयार नाही. दुष्काळमुळे पोट भरण्यासाठी मुंबईला आलेल्या एका तरुणीला आपलं सर्वस्व गमवावं लागले. चेंबर येथे केटरींगच काम करायला आलेल्या मुलीवर चार जणांनी बलात्कार केला असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. या अत्याचाराने मुलीचं मानसिक संतुलन बिघडल्याने तिच्यावर औरंगाबदमध्ये उपचार सुरू आहेत.
आढेगावात आकाशातून पडले आगीचे गोळे, ग्रामस्थ भयभीत
पीडित मुलगी ही जालना जिल्ह्यातली असून गावाकडे दुष्काळमुळे रोजगार नसल्याने मुंबईला केटरींगचे काम करायला आली होती. चेंबूरला भावाकडे राहून ती हे काम करत होती. मात्र आठ दिवसापुर्वी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती. त्याच रात्री ती परत आली आणि घराच्या बाहेरच पडलीच नाही. तिची तब्येत अचानक बिघडल्याने तिच्या वडिलांनी तिला औरंगाबदला परत आणलं.
मुंबई गोवा महामार्ग ठप्प, जगबुडीच्या पाण्याची पातळी 7 मीटरने वाढली
गावाकडे मुलीला आणल्यानंतर तिची अवस्था अजूनच बिघडली. तिचा कमरेखालचा बधीर होत गेला. तिला अर्धांगवायूचा झटका आला असावा अशी शंका तिच्या कुटुंबीयांना आली. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा त्यांना धक्का बसला. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याचं डॉक्टरांनी तिच्या वडिलांना सांगितलं. तिच्या शरीरावर जखमाही आढळून आल्या होत्या. शेवटी तिच्या वडिलांनी तीला विश्वासात घेवून विचारल्यावर तीने चेंबूर मध्ये चार जणांनी अत्याचार केल्याचं सांगितलं आणि घडलेली घटना सांगितली. त्यामुळे तिच्या वडिलांनाही मोठा धक्का बसलाय.
त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पीडित मुलीची पुर्ण तपासणी घाटी रूग्णालय करणार आहे. तिला धक्का बसला असून मानसिक परिणामही झालाय. त्यामुळे त्या पद्धतीनेही उपचार करण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.