दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, VIDEO सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी

दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, VIDEO सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी

सगळ्यात धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर 5 नराधमांनी बलात्कार केला. या प्रकरणात आता पंढरपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी

पंढरपूर, 17 ऑगस्ट : पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पाच नराधमांनी 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. बलात्काराच्या या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर हादरलं आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर 5 नराधमांनी बलात्कार केला. या प्रकरणात आता पंढरपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 आरोपींपैकी पीडित तरुणी एकाची मैत्रिण होती. त्याने तिला एका अज्ञात स्थळी सुलभ शौचालयाजवळ बोलावलं. त्यानंतर पाचही आरोपींकडून तिच्यावर बलात्कारासाठी दबाव टाकण्यात आला. यातील एका आरोपीने तिला छेडलं तर दुसऱ्याने तिला दारू पाजली. त्यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. यात 5व्या मुलाने सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करू अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली.

बलात्काराचा व्हिडिओ शेअर होईल या भीतीमुळे पीडितेने ही घटना कोणालाही सांगतली नाही. याचाच फायदा घेत तरुणांनी तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. तिच्याकडे पैशांची मागणीदेखील करण्यात आली. काही दिवसांनी पीडित तरुणीच्या घरी तिच्या वागण्यात फरक जाणवू लागला आणि त्यानंतर तिच्या आईने विचारलं असता या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.

इतर बातम्या - धक्कादायक! मुंबईच्या PSIची पोलीस मुख्यालयात आत्महत्या, गळफास घेत आयुष्य संपवलं

पीडित तरुणीच्या घरच्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर एकाचा शोध सुरू आहे. या सगळ्या प्रकारामुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर संपूर्ण नागरिकांमध्ये आणि तरुणांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 आरोपींची नावं-

- मनोज माने

- साहिल सुधीर अभंगरा

- अक्षय दिलीप कोळी

- आरिफ शेख

- माऊली तुकाराम अंकुशराव

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 10:59 AM IST

ताज्या बातम्या