मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

3 लग्नाळू तरुण आणि 1 मुलगी, लग्नाचा भाव 2 लाख रुपये, पण लोचा झाला अन्...

3 लग्नाळू तरुण आणि 1 मुलगी, लग्नाचा भाव 2 लाख रुपये, पण लोचा झाला अन्...

पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली असून या बंटी बबली गँगने याअगोदर पण तिघांना असंच फसवल्याचे उघड झाले.

पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली असून या बंटी बबली गँगने याअगोदर पण तिघांना असंच फसवल्याचे उघड झाले.

पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली असून या बंटी बबली गँगने याअगोदर पण तिघांना असंच फसवल्याचे उघड झाले.

जालना, 10 मे : लग्नाळू मुलांना हल्ली मुलीच मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहे. नेमकं याच संधीचा फायदा घेऊन काही भामटे हे लग्नाळू तरुणाला (Marriage  fraud) फसवत असल्याचे प्रकरणं समोर येत आहे. जालन्यात (jalana) सुद्धा लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या बंटी- बबली गँगचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. एकाच वेळी तीन मुलांच्या पाहण्याच्या कार्यक्रमाने आयोजित केल्यामुळे या टोळीचे बिंग फुटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील एका शेतात छापा मारून टेंभुर्णी पोलिसांनी लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या बंटी-बबली गँगचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने एकच दिवशी तीन मुलांच्या पाहण्याच्या कार्यक्रम ठरवला होता. पण पोलिसांनी चांगलीच या टोळीची वरात काढली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली असून या बंटी बबली गँगने याअगोदर पण तिघांना असंच फसवल्याचे उघड झाले. (रत्नागिरी जिल्ह्यातील ‘या’ गावाला मगरींमुळे मिळाला रोजगार) सातेफळ येथील सविता माळी यांच्या शेतात काही लोक जमा झाली असून काही तरी संशयास्पद असल्याची  गोपनीय माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना खबऱ्या मार्फत मिळाली. पोलिसांनी सापळा रचून छापा मारला असता एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या मुलांना एकच मुलगी दाखवून मुलांकडील मंडळीकडून प्रत्येकी 2 लाख रुपये उकळण्याचा कट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ज्यामध्ये भडगाव जि.जळगाव व फुलंब्री तालुका औरंगाबाद येथील 2 व इतर अजून एका लग्नाळू मुलाचा समावेश आहे. परंतुस सदर दोन्ही वर पक्षाचे मंडळी एकाच वेळी समोरासमोर आल्याने त्यांच्यात वाद होऊन बंटी बबली गँगचं बिंग फुटलं. (शेअर बाजारात गुंतवणुकीची जोखीम नको, मग 'हे' पर्याय तुम्हाला ठरतील फायदेशीर) या प्रकरणात जळगाव येथील वधू पक्षाकडील लोकांनी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत संशयित आरोपी सविता राधाकिसन माळी, अनिल राधाकिसन माळी (रा. सातेफळ), सुनिता बाळूमामा माळी (रा. सावंगी वर्गणी), सुषमा सुभाष बेळगे (रा. पवन नगर वाळूज पंढरपूर ), अनिल जगन्नाथ बनकर ( राहणार शृंगारवाडी ), शिला मनोहर बनकर (राहणार एक्तुनी) शितल बाबुराव निकम (रा.विसरवाडी ) या भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सातही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील महिला व आरोपींच्या मोबाईलमध्ये विविध मुला मुलींचे बायोडेटा आढळून आले आहे. ज्यावरून चौकशी केली असता या बंटी बबली गँगने धुळे, औरंगाबाद, जळगाव, परभणी आणि नांदेड येथील तरुणांना अशाच प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून आणि लग्नाळू मुलांच्या नातेवाईकांना लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून लुबडल्याचे निष्पन्न झाले आहे.
First published:

पुढील बातम्या