गणेशोत्सवाचे जनक टिळक नसून भाऊ रंगारी ; कोर्टात याचिका करणार दाखल

गणेशोत्सवाचे जनक टिळक नसून भाऊ रंगारी ; कोर्टात याचिका करणार दाखल

लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक नाहीत यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात दाद मागितलीय.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे

11 जुलै : लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक नाहीत यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात दाद मागितलीय.

गणेशोत्सव कुणी सुरू केला असा प्रश्न आला तर उत्तर तोंडपाठ...लोकमान्य बाळ गंगाधर टिळक...हे आपल्याला अगदी शाळेपासून शिकवलंय. पण गणेशोत्सव टिळकांनी नाही तर भाऊ रंगारी यांनी सुरू केला असा दावा या गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी केलाय.

भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचा दावा

1892 साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली

1892 साली आणखी 3 मंडळांकडून गणेशाची स्थापना

1893 साली गणेश मंडळांची संख्या वाढून 20-25 वर

1894 साली विंचूरकर वाड्यात लोकमान्य टिळकांकडून गणेश मंडळाची स्थापना

लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे?

असा दावा करत भाऊ रंगारी गणेश मंडळांने पुढील मागण्यांसाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलंय.

भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या मागण्या

- भाऊ रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे

जनक म्हणून जाहीर करावं

-सार्वजनिक गणेश उत्सवाचं हे

126 वे वर्ष आहे 125 वे नाही

गणेशोत्सव आणि टिळक हे समिकरण आहे. मात्र आता नवा वाद निर्माण झाला आणि तो कोर्टातही गेला. इतिहासाच्या पानांमधून याचं उत्तर मिळेलच पण महत्वाचं आहे. ते या उत्सवाचं पावित्र्य कायम राहणं महत्वाचं...

First published: July 11, 2017, 8:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading