News18 Lokmat वर दिसेल तुमचा बाप्पा; असे व्हा स्पर्धेत सहभागी

News18 Lokmat वर दिसेल तुमचा बाप्पा; असे व्हा स्पर्धेत सहभागी

तुम्ही केलेली बाप्पाची सजावट सगळ्यांनी पाहावी, त्याचं कौतुक व्हावं असं वाटतं ना... मग जरा हे नीट वाचा आणि सहभागी व्हा आणि शेअर करा.

  • Share this:

मुंबई : तुम्ही केलेली बाप्पाची सजावट सगळ्यांनी पाहावी, त्याचं कौतुक व्हावं असं वाटतं ना, तसंच घसबसल्या हातातल्या मोबाईलवरच गणपतीचं सुंदर LIVE दर्शन झालं तर... यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त News18 Lokmat यासाठीच घेऊन येत आहे - सर्वकार्येषु सर्वदा - गणेशोत्सव 2019. News18lokmat.com या आमच्या वेबसाइटवर गणेशोत्सवानिमित्त खास विभाग सुरू आहे. त्यामध्ये तुम्ही लालबागच्या राजाचं LIVE दर्शन घेऊ शकता - अगदी 24 तास. याशिवाय तुमच्या बाप्पाचे फोटो जगप्रसिद्ध करण्यासाठी आम्ही तीन स्पर्धा घेऊन आलो आहोत. तुमच्या फोटोग्राफीचं कौशल्य दाखवता येईल.

बेस्ट गणेशोत्सव मोमेंट

गणपती उत्सवातला तुम्हाला भावलेला क्षण कॅमेऱ्यावर क्लिक करून आम्हाला पाठवा. गणपती, सजावट, माणसं, कार्यकर्ते, संगीत, नृत्य, पूजा, प्रसाद, देखावे, सुरक्षा... या कशातही बेस्ट मोमेंट सापडू शकेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी इथे क्लिक करा. गणेशोत्सवाचा मूड टिपणारा सर्वोत्कृष्ट फोटो बक्षीसपात्र ठरेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या लिंकवर  क्लिक करा.

बाल गणेश चित्रकला स्पर्धा

तुमच्या छोट्यांनी चितारलेला गणेश आम्हाला पाठवा. मुलांनी (वयोगट 12 च्या आत ) काढलेली गणपतीची चित्र यासाठी विचारात घेतली जातील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी इथे क्लिक करून तुमची माहिती भरा आणि चित्राचा फोटो काढून/ स्कॅन करून दिलेल्या फॉर्ममध्ये अपलोड करा. ही स्पर्धा 12 वर्षांच्या आतल्या मुला-मुलींसाठी आहे.  स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

इको फ्रेंडली घरगुती गणपती

घरच्या गणपतीची सजावट पर्यावरणाचा सजगपणे विचार करून ठरवली असेल तर आम्हाला जरूर फोटो पाठवा.

त्यासाठी इथे क्लिक करा. सर्वोत्कृष्ट सजावट आणि पर्यावरणाचा पुरेपूर विचार लक्षात घेऊन विजेते ठरवण्यात येतील. या लिंकवर क्लिक करा.

फोटो अपलोड कुठे करायचे?

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटवर गणेशोत्सव 2019 वर क्लिक करा. लालबागच्या राजाचं लाइव्ह दर्शन तुम्हाला तिथे घेता येईल. शिवाय खाली स्क्रोल केलं की तिन्ही स्पर्धांचे आयकॉन दिसतील. त्यावर क्लिक केलं की, Play Contest असा पर्याय येईल. त्यावर क्लिक केलं की, एक छोटा फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव, इ मेल आणि मोबाईल नंबर लिहून तुमचा फोटो (.jpeg format )अपलोड करता येईल.

हे वाचा - या देशात गाढ झोपेसाठी लोक मोजतात चक्क 5.8 लाख रुपये!

हे फोटो आमचं परीक्षक मंडळ पाहील आणि त्यातून सर्वोत्कृष्ट फोटोची आणि चित्राची निवड करण्यात येईल. विजेत्यांना बक्षिसं दिली जातील.

हेही वाचा तुम्हालाही जास्त गोड खाण्याची सवय आहे? मग वेळीच व्हा सावध

जगातील आक्रमक हेलिकॉप्टर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात, पाहा LIVE VIDEO

First published: September 4, 2019, 7:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading