बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे 'विघ्न'; गणेशभक्तांमध्ये संताप

बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे 'विघ्न'; गणेशभक्तांमध्ये संताप

भिवंडी मनपाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून आता विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमन मिरवणुकीला या खड्डयांचे विघ्न येत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप पसरला आहे.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 19 ऑगस्ट : गणेशोत्सव जवळ आल्याने सर्वत्र गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे. तर गणेश मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मोठ्या मंडळातील बाप्पांचं आगमनही झालं आहे. पण याच आगमनावेळी भिवंडीमध्ये गणेशभक्त संतापले आहेत. भिवंडी मनपाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून आता विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमन मिरवणुकीला या खड्डयांचे विघ्न येत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप पसरला आहे.

2 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे विविध सार्वजनिक उत्सव मंडळानी मुंबई आणि परिसरातून मोठमोठ्या गणेशमुर्ती वाजत-गाजत आणण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी कल्याण रोड मार्गावर खराब रस्ता आणि उड्डाणपूल कामामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कापआळी यांच्या गणेश मूर्तीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मिरवणुकीचा मार्ग मोकळा करत वाहतूक कोंडी सोडवीली. मात्र, खराब  आणि नादुरुस्त झालेल्या रस्त्यांवरून गणेशमुर्ती आणल्या जात असल्यामुळे गणेशोत्सव मंडळानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

इतर बातम्या - रिलायन्स समुहाकडून पूरग्रस्तांसाठी 5 कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांकडे दिला धनादेश

महापालिका प्रशासनाकडे रस्ते दुरुस्ती बाबतीत निवेदन देऊनसुद्धा पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भिवंडीतील रस्त्यांवर पालिकेने पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीच्या नावे कोट्यवधी रूपये खर्च केले. मात्र, मुसळधार पावसात या दुरुस्त केलेल्या रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवासी हैराण झाले आहेत.

विशेष म्हणजे गणेशोत्सव जवळ आल्याने या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी लेखी मागणी गणेशोत्सव मंडळ अध्यक्षांनी मनपा प्रशासनाकडे दिली होती. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

VIDEO: कायद्याचा धाक आहे? लोकांकडून उघडपणे होतोय हवेत गोळीबार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading