गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात 11 जणांचा मृत्यू

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात 11 जणांचा मृत्यू

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, दिवसभरात ठिकठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय.

  • Share this:

मुंबई, 5 सप्टेंबर : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, आज दिवसभरात ठिकठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय. औरंगाबादमध्ये गणेश विसर्जनादरम्यान दोन ठिकाणच्या घटनांमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय.

जळगाव जिल्ह्यातही जामनेर तालुक्यात शेंदुर्णी येथे गणेश विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या संतोष धनगर २१ व योगेश धनगर २३ या दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. नाशिकमध्येही मुंगसरे गावाजवळील तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय, गणेश मराळे असं 18 वर्षीय मयत तरुणाचं नाव आहे.

पिंपरी चिंचवडमध्येही गणेश विसर्जनासाठी गेलेली 2 मुलं पाण्यात बुडून मरण पावलीत. माजलगावमध्ये विसर्जनादरम्यान, एका 15 वर्षीय तरुणांचा मृत्यू झालाय.

दरम्यान, पुणे आणि मुंबईत रात्रभर सार्वजनिक गणेश मिरवणुका सुरूच राहणार आहेत. मुंबईत लालबागची मिरवणूक तर पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या रथाची नेत्रदीपक रोषणाई हे गणेश भक्तांसाठी खास आकर्षण असतं. या दोन्ही शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

First published: September 5, 2017, 9:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading