राष्ट्रवादी घडवणार राज्याच्या राजकारणात भूकंप, गणेश नाईकांच्या कुटुंबात फूट?

राष्ट्रवादी घडवणार राज्याच्या राजकारणात भूकंप, गणेश नाईकांच्या कुटुंबात फूट?

नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 31 ऑगस्ट : भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण गणेश नाईक यांचा मोठा मुलगा आणि माजी खासदार संजीव नाईक राष्ट्रवादीतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाईक कुटुंबात मोठी फूट पडू शकते.

संजीव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत सपत्नीक गाडीने प्रवास केला आहे. संवाद यात्रेच्या माध्यामातून सुप्रिया सुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. नवी मुंबईतील संवाद यात्रेवेळी संजीव नाईक हे आपल्या पत्नीसह सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिसून आले. संजीव नाईक यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत सुप्रिया सुळेंना सोडलं. तसंच दुपारी 1 वाजता पुन्हा सुप्रिया सुळे आणि संजीव नाईकांची भेट होणार आहे.

गणेश नाईक राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या तयारीत

गणेश नाईक नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांचे पूत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता जिल्ह्यातील नेते, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांसह गणेश नाईक लवकरच प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे.

राष्ट्रवादीनेही भाजपच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी हालाचाली सुरू केल्या आहेत. नवी मुंबईत नवं नेतृत्व उभं करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता विरोधी पक्षातील नाराजांना संपर्क केला जात आहे.

नवी मुंबईत नाईक कुटुंबासह राष्ट्रवादीचे इतर नगरसेवकही भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या नगरसेवकांना रोखण्यासाठी ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत, अशी माहिती आहे. त्यामुळे नवी मुंबईतील काही नगरसेवक राष्ट्रवादी सोडणार नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्व 57 नगरसेवक हातावरचं घड्याळ सोडून हातात 'कमळ' घेणार असल्याची चर्चा याआधी रंगत होती. या नगरसेवकांनी भाजप प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला प्रचंड मोठं खिंडार पडू शकतं. नवी मुंबई हा राष्ट्रवादीला गड समजला जातो आणि तिथेच मोठं खिंडार पडल्याने पक्षाला हा मोठा हादरा मानला ठरू शकतो.

कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: August 31, 2019, 11:50 AM IST

ताज्या बातम्या