मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गणेशमूर्ती सजतायत आकर्षक रंगांत

गणेशमूर्ती सजतायत आकर्षक रंगांत

रत्नागिरीतल्या होरांबेंच्या या गणेशचित्रशाळेत गणेशमूर्तींचं रूप खुलवण्याची लगबग सुरू आहे आणि भक्तांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या रंगात.

रत्नागिरीतल्या होरांबेंच्या या गणेशचित्रशाळेत गणेशमूर्तींचं रूप खुलवण्याची लगबग सुरू आहे आणि भक्तांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या रंगात.

रत्नागिरीतल्या होरांबेंच्या या गणेशचित्रशाळेत गणेशमूर्तींचं रूप खुलवण्याची लगबग सुरू आहे आणि भक्तांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या रंगात.

दिनेश केळुसकर, रत्नागिरी, 18 आॅगस्ट : लंबोदर पीतांबर असं गणपतीबाप्पाचं वर्णन आपण त्याच्या पारंपरिक आरतीमधून ऐकतो. पण हल्ली गणेशभक्तांच्या आवडीनुसारच त्यांच्या बाप्पांना सजवलं जातंय. कोकणातल्या गणेशमूर्तींच्या चित्रशाळेत असे वेगवेगळ्या रूपातले बाप्पा आता भक्तांच्या घरी विराजमान होण्यासाठी सज्ज झालेत . रत्नागिरीतल्या होरांबेंच्या या गणेशचित्रशाळेत गणेशमूर्तींचं रूप खुलवण्याची लगबग सुरू आहे आणि भक्तांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या रंगात. म्हणजे आता हेच बघा, एकेका गणेशमूर्तींच्या धोतर आणि शेल्यांचेच रंग किती वेगवेगळे आहेत. एकेका गणेशमूर्तीच्या रंगकामाला वेगवेगळ्या रंगांच्या  20 ते 25  शेड्स वापराव्या लागतात. मूर्तिकार अनंत होरांबे सांगतात, 'पूर्वी काय होतं की धोतरासाठी पिवळा कलरच फेमस होता. कधी बदलत नव्हते . पिवळा पीतांबरच म्हणायचे पण आता असे कलर आलेत की धोतरासाठी 15/ 20 शेड्स नवीन आलेल्या आहेत. वॉरनिश , पर्ल , फ्लोरोसन, प्रभावळसाठी कॉपरमध्ये, पितळ, सोनेरी गणपतीला वेगवेगळ्या रूपात घडवून घेण्याचाही ट्रेंड हल्ली वाढत जातोय. त्यामुळे भक्तांची जशी मागणी तशी गणेशमूर्तीची किंमत या मूर्तिकारांना आकारावी लागते. आपल्या घरच्या गणपतीचं रूप आपल्या मनातल्या गणपतीसारखं असावं, असं प्रत्येक गणेशभक्ताला वाटत असतं. गणेशोत्सव आता अवघ्या पाच दिवसांवर आल्यामुळे कोकणातल्या प्रत्येक गणेशमूर्ती शाळेत अशी लगबग सुरू आहे. येत्या 22 ऑगस्टपासून लाखोंच्या संख्येने गणेशभक्त कोकणात दाखल व्हायला सुरुवात होणार आहे.
First published:

Tags: Ratnagiri, गणपती, रत्नागिरी

पुढील बातम्या