Selfie with Bappa: तुमच्या बाप्पाबरोबरचा सर्वोत्तम क्षण आम्हाला पाठवा

Selfie with Bappa: तुमच्या बाप्पाबरोबरचा सर्वोत्तम क्षण आम्हाला पाठवा

Coronavirus साथीच्या काळातही तुमच्या गणपतीचं दर्शन जगाला होईल अशी स्पर्धा आम्ही घेऊन आलो आहोत.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : गणेशोत्सवाच्या निमित्ताने (Ganesh Chaturthi 2020) तुमच्या बाप्पाचं दर्शन जगाला घेऊ द्या. तुमच्या कलाकौशल्याला नवं व्यासपीठ देण्यासाठी News18lokmat.com एक स्पर्धा घेऊन येत आहे. तुम्ही केलेली बाप्पाची सजावट सगळ्यांनी पाहावी, त्याचं कौतुक व्हावं असं वाटतं ना? Coronavirus साथीच्या काळातही तुमच्या गणपतीचं दर्शन जगाला होईल अशी स्पर्धा आम्ही घेऊन आलो आहोत.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही फक्त एवढं करायचं की, बाप्पाबरोबरचा एक सेल्फी आम्हाला पाठवायचा. तुमचा सगळा परिवार या फोटो बाप्पासह दिसला तर उत्तमच. त्यासाठी ही लिंक क्लिक करा.

फोटो अपलोड कुठे करायचे?

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटवर गणेशोत्सवानिमित्त स्वतंत्र विभाग तयार केला आहे. त्यावर क्लिक करा. स्पर्धेसाठी फोटो पाठवा असं लिहिलेला विभाग तिथे दिसेल. एक छोटा फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव, इ मेल आणि मोबाईल नंबर लिहून तुमचा फोटो (.jpeg format )अपलोड करता येईल. तिथे तुमच्या फोटोग्राफीचं कौशल्य दाखवता येईल.

हे फोटो आमचं परीक्षक मंडळ पाहील आणि त्यातून सर्वोत्कृष्ट फोटोची निवड करण्यात येईल. विजेत्यांना बक्षिसं दिली जातील.

गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायक आणि दगडूशेठचं LIVE दर्शन

News18lokmat च्या या खास विभागात प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं आणि पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं LIVE दर्शन घेऊ शकता अगदी 24 तास. याशिवाय गणेशोत्सवाच्या संबंधित विविध बातम्या, ताजे अपडेट्स आणि फोटो गॅलरी, व्हिडीओ या विभागात पाहता येतील.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 25, 2020, 9:32 PM IST

ताज्या बातम्या