कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांना क्वारन्टाईन करणार का? काय म्हणाले शिवसेना मंत्री

कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांना क्वारन्टाईन करणार का? काय म्हणाले शिवसेना मंत्री

कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्यांना 14 ऐवजी 7 दिवसं क्वारन्टाईन करावे. प्रत्येक चाकरमान्यांची सवलतीत किंवा मोफत कोविड टेस्ट करावी.

  • Share this:

मुंबई, 14 जुलै: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं आहे. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. त्यात गणेशोत्सव जवळ येत आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणं ही मुंबईकरांची परंपरा आहे. अनेक चाकरमाने गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. यंदा गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी नियम शिथिल करावेत, या मागणीसाठी कोकणातील सर्व पालकमंत्री, खासदार आणि आमदारांची आज (मंगळवार) मंत्रालयात दुपारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठक झाली. कोकणात गणपतीला मुंबईतील चाकरमान्यांना प्रवेश देण्याच्याही मुद्दावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

हेही वाचा...गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी शिवसेनेचा नवा प्लॅन

मंत्रालयात बैठकीस उदय सामंत, अनिल परब, आदिती तटकरे कॅबिनेट मंत्रीसह कोकणातील आमदार, खासदर उपस्थितीत होते. कोकणात गणपती प्रवेश देताना नियमावली यावरून नाराजी आहे, त्यावर चर्चा करून त्यात बदल करणे शक्य आहे का? यावर चर्चा मंत्र्यांमध्ये चर्चा झाली.

कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्यांना 14 ऐवजी 7 दिवसं क्वारन्टाईन करावे. प्रत्येक चाकरमान्यांची सवलतीत किंवा मोफत कोविड टेस्ट करावी आणि कोकणातल्या गणेशभक्तानी यंदा 11 ऐवजी 7 दिवसांचाच घरगुती गणेशोत्सव करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

या बेठकीनंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनिल परब यांनी सांगितल की, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सर्व लोकप्रतिनिधींसोबत चर्चा झाली आहे. या चर्चेत सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागणी चर्चेत आणल्या. त्यांचे सर्व सूचना आणि प्रस्ताव आम्ही आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार आहे. मुख्यमंत्र्यांना सर्व अधिकार आहेत. त्यामुळे ते लवकरच यासंदर्भात आपला निर्णय जाहीर करतील.

यंदा 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात मुंबई आणि परीसरातून लाखोंच्या संख्येने गणेशभक्तं आपापल्या गावाकडे जातात. त्यांना यंदाच्या वर्षी कोरोन संसर्ग साथीमुळे नियमांचे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणात जाणार्या गणेशभक्तांमध्ये नाराजी आहे. गौरी-गणपतीसाठी हे नियम शिथील करावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांमध्ये कोकणात य शिथिलता देणार याचा निर्णय लवकरच मुख्यमंत्री घेणार आहेत. बैठकीत होणार आहे.

हेही वाचा...बापरे! ढगफुटीसारखा पाऊस, 40 ते 50 एकरातील अंकुरलेली पिकं वाहून गेली

जेव्हा निर्णय होईल, तेंव्हा अडचण निर्माण होऊ, नये यासाठी आम्ही सर्व तयारी करून ठेवली आहे. किती गाड्या सोडायच्या आहेत. किती परवानगी पासेस द्यायचे आहेत. जसा निर्णय येईल, तसा जाहीर केलं जाईल, असं अनिल परब यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Published by: Sandip Parolekar
First published: July 14, 2020, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading