weather update: आठवडाभर दडी मारलेल्या पावसाचं दमदार कमबॅक; मुंबई, कोकण, मराठवाड्यात पावसाची हजेरी

weather update: आठवडाभर दडी मारलेल्या पावसाचं दमदार कमबॅक; मुंबई, कोकण, मराठवाड्यात पावसाची हजेरी

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पावसाचं पुन्हा एकदा पुनरागमन. शनिवारी आणि रविवारी पुन्हा एकदा राज्यात पावसाची दमदार हजेरी.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेंबर: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पावसानं पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. शनिवारी आणि रविवारी पुन्हा एकदा पावसानं राज्यातील विविध भागांमध्ये दमदार हजेरी लावली. मुंबई, कोकण किनारपट्टी, मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन दिवस पाऊस असण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेगही जास्त असल्यानं मासेमारी करणाऱ्या बांधवांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरू होता. मुंबई, कोकण मराठवाड्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाल्यानं बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासाही मिळाला आहे. शनिवारी (31 ऑगस्ट) रोजी  मुंबईत सकाळपासून पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत सांताक्रूझमध्ये ८.५ तर कुलाबा येथे ०.४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर  कोकण, गोवा आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय झाला आहे.

बॉम्बे में कुछ बडा होनेवाला है... 'त्या' एका फोन कॉलने उडाली खळबळ

राज्यातील इतर पावसाचे अपडेट्स

परभणीत गेल्या तीन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसानं शनिवारी(31 ऑगस्ट)रोजी हजेरी लावली.  परभणीसह जिल्ह्यातील पाथरी, मानवत, सोनपेठ तालुक्यातील काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला. काही भागात जोरदार तर काही भागांमध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. जालना शहरामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे शेतकरीही सुखावला आहे.

औरंगाबादमध्ये शनिवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे.

तिकडे नाशिकमध्ये मनमाड शहरासह ग्रामीण भागात पावसाने आज सगल दुसऱ्या दिवशीही दमदार हजेरी लावली. 2 दिवस पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळालं. गेल्या काही दिवसा पासून दडी मारून बसलेला पाऊस अखेर शनिवारी चांदवड,नांदगांव आणि सटाणा भागात  बरसला.चांदवडला जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून नांदगावला चांगला तर सटाणा भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.पावसाचे पुनरागमन शेतकरी आणि नागरिकही सुखावले आहेत.

मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 07:30 AM IST

ताज्या बातम्या