ही आहे पुण्यातील मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापनाची वेळ

ही आहे पुण्यातील मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापनाची वेळ

या मिरवणुकींचं वैशिष्ट्य म्हणजे येथे पारंपरिकतेच दर्शन आपल्याला पाहायला मिळते

  • Share this:

पुणे, १३ सप्टेंबर-  पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचलेला पाहायला मिळतोय. पुण्यातील मानाच्या पाच गणपतीच्या मिरवणुका येथील खास आकर्षण ठरतात. लोकप्रिय गणपतीच्या मिरवणुकांमधील ढोलताशांच्या वादनाने मिरवणुकीत एक वेगळाच उत्साह असतो. या मिरवणुकींचे वैशिष्ट म्हणजे येथे पारंपरिकतेच दर्शन आपल्याला पाहायला मिळते. पुण्य़ातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती या गणपतीची प्रतिष्ठापना  ११ वाजून ४० मिनिटांनी करण्यात येणार आहे. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी या गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी करण्यात येणार आहे.

पुण्यातील मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापनाची वेळ

मानाचा पहिला गणपती : कसबा गणपती

प्रतिष्ठापना: ११ वाजून ४० मिनिटांनी

मिरवणूक: सकाळी ९:३०

मानाचा दुसरा गणपती: तांबडी जोगेश्वरी

श्रींची प्रतिष्ठापना:  दुपारी १२:००

मिरवणूक सकाळी: सकाळी १०:००

मानाचा तिसरा गणपती: गुरुजी तालीम मंडळ

प्रतिष्ठापना: दुपारी ०१:००

मिरवणुकीची वेळ:  सकाळी १०:००

मानाचा चौथा गणपती: तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ

प्रतिष्ठापना: दुपारी १२:३०

मिरवणुकीची वेळ: सकाळी ०९:३०

मानाचा पाचवा गणपती: केसरीवाडा

मिरवणुकीची वेळ: सकाळी १०:००

प्रतिष्ठापना: सकाळी ११:३०

VIDEO - गणेशोत्सव विशेष : गणपतीच्या डोक्यावर चंद्र कसा आला?

First published: September 13, 2018, 8:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading