मोदींच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठला महाआरती

मोदींच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठला महाआरती

  • Share this:

पुणे, 17 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 67वा वाढदिवस. हा दिवस देशभर ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम करून साजरा केला जातोय. पुण्यातही या निमित्त दगडूशेठ गणपतीची आरती करण्यात आली.

पुण्यात भाजपतर्फे  प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिरात नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी देशाच्या लाडक्या पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली असल्याचं शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितलं. तसंच यावेळी पुणे भाजपमध्ये चाललेल्या गिरीश बापट-संजय काकडे वादावर काहीही बोलणं त्यांनी टाळलं. 'माझ्यापर्यंत हा वाद आलेला नाही.जेव्हा येईल तेव्हा बघू' अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष गोगावले यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 03:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading