मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नंदुरबारमध्ये 'द बर्निंग ट्रेन'; गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग, VIDEO

नंदुरबारमध्ये 'द बर्निंग ट्रेन'; गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग, VIDEO

नंदुरबारमध्ये 'द बर्निंग ट्रेन';  गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग, VIDEO

नंदुरबारमध्ये 'द बर्निंग ट्रेन'; गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग, VIDEO

LIVE VIDEO Gandhidham puri express coach catch fire: नंदुरबारमध्ये गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागली आहे. नंदुरबार रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे.

निलेश पवार, प्रतिनिधी

नंदुरबार, 29 जानेवारी : गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग (Gandhidham Puri Express catches fire) लागली आहे. नंदुरबार रेल्वे स्थानकापासून (Nandurbar Railway Station) काही अंतरावर ही घटना घडली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. मात्र, आग ही आणखी वाढत असल्याचं दिसत आहे. (Gandhidham puri express coach catch fire near nandurbar railway station Maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार, गांधीधाम येथून पुरीच्या दिशेने ही ट्रेन निघाली होती. नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर गाडी असताना एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्यात अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वेतील प्रवाशी तात्काळ गाडीतून बाहेर पडले.

सुरुवातीला ट्रेनमधील पॅन्ट्रीच्या डब्याला ही आग लागली. आग तात्काळ वेगाने पसरली आणि शेजारील दोन डब्यांना आग लागली. आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वाचा : महाराष्ट्रातील मास्क सक्ती हटवली जाणार? मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

पश्चिम रेल्वेचे संपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, गांधीधाम - पुरी एक्सप्रेसमधील डब्याला आग लागली होती. आग लागलेला डबा इतर गाडीपासून वेगळा करुन आग विझवण्याचं काम सुरू केलं. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप नाहीये, चौकशीनंतर त्याचं कारण समोर येईल. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाहीये.

घटनास्थळी नंदुरबार अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे. ज्या डब्यांना आग लागली होती ते दोन डबे इतर डब्यांपासून वेगळे करण्यात आले आहेत. या डब्यांना लागलेली आग विझवण्यात येत असून दोन डब्यांत कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्याला ही आग लागली. पॅन्ट्रीच्या डब्यात खानपानाचे साहित्य, सिलिंडर असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. सध्यातरी रेल्वेत कुणीही प्रवासी नाहीये मात्र, सर्व प्रवाशांचे साहित्य ट्रेनमध्ये आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, रेल्वेचे प्रशासनाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्याचे कळताच ट्रेन थांबवण्यात आली आणि प्रवासी तात्काळ गाडीतून खाली उतरले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

First published:
top videos

    Tags: Fire