Home /News /maharashtra /

Yavatmal: जिल्हा परिषदेच्या आवारातच मांडला जुगाराचा अड्डा, झेडपीच्या 8 कर्मचाऱ्यांना अटक

Yavatmal: जिल्हा परिषदेच्या आवारातच मांडला जुगाराचा अड्डा, झेडपीच्या 8 कर्मचाऱ्यांना अटक

चक्क जिल्हा परिषदेच्या परिसरातच जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या आठ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

यवतमाळ, 29 जानेवारी : यवतमाळ जिल्हा परिषेदेच्या (Yavatmal Zilla Parishad) आवारात जुगार खेळला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुगाराचा अड्डा जिल्हा परिषदेच्या आवारात सुरू असल्याची माहिती अवधुतवाडी पोलिसांना मिळली आणि त्याची खातरजमा करुन पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी जिल्हा परिषेदेचे 8 कर्मचारी जुगार खेळतांना आढळून आल्याने त्यांच्या वर कारवाई करण्यात आली आहे. मात्र घटनास्थळाहुन काही मोठे जुगारी फरार झाल्याची माहिती आहे. या जुगाऱ्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (ZP employees arrest while playing gambling in Yavatmal Zilla Parishad premises) प्रकाश वामन कुद्र पवार, देवनांद विठ्ठल जामनकर, गणेश गोस्वावी, प्रकाश व्यास, गुणवंत ढाकणे, अनिल शिरभाते, संदीप श्रीराम , चरण तारासिंग राठोड अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय असून या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक आपले काम घेऊन येतात. मात्र त्यांना थातुरमातुर उत्तर देऊन आल्या पावली परत पाठवून कर्मचारी, अधिकारी आपल्या वैयक्तिक कामात व्यस्त होऊन जातात. जे कार्यालय ग्रामीण भागाच्या लोकांच्या सेवेसाठी आहे. त्याचठिकाणी आशा जुगार भरवला जात आहे. या जुगार प्रकरणाने जिल्हा परिषेदेचे लक्तरे वेशीला टांगली गेली असून मुख्याधिकारी नेमकी काय भूमिका घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वाचा : ती किंचाळत होती अन् लोक शूट करत होते, कोल्हापुरातील हत्येचा LIVE VIDEO VIRAL मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त मुंबईतील दहिसर भागात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. मुंबईमध्ये आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. 7 कोटी रुपयांच्या नोटा मुंबईच्या बाजारात चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता. पण पोलिसांनी वेळीच हा डाव उधळून लावला. पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली आहे. कोलकाताच्या मुली, 'डॉन'चा गेस्ट हाऊसमध्ये नंगानाच बिहारच्या एका कुख्यात डॉनला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. हा डॉन एका हॉटेलमध्ये कोलकाताच्या दोन तरुणींसोबत चाळे करताना रंगेहात पकडला गेलाय. संबंधित घटना ही बिहारच्या गया जिल्ह्यातील आहे. या कुख्यात डॉनचं नाव चिंटू पांडे उर्फ चिंटू बाबा असं आहे. काही दिवसांपासून तो फरार होता. त्याने अनेकदा दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या विरोधात गया जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होते. विशेष म्हणजे त्याच्याविरोधात गया जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात तर तब्बल सहा गुन्हे दाखल होते. पण अखेर त्याचा पापाचा घडा भरला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Yavatmal

पुढील बातम्या