राज्यातील सिंचन प्रकल्पांना 1 हजार कोटी देणार -गडकरी

राज्यातील सिंचन प्रकल्पांना 1 हजार कोटी देणार -गडकरी

राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद सरकारकडून 1 हजार कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेतला.

  • Share this:

मुंबई, 8 सप्टेंबर : राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद सरकारकडून 1 हजार कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यात राज्यातील 26 प्रकल्पांचे पैसे केंद्राकडून लवकर उपलब्ध करून दिले जातील. तसंच राज्याची सिंचन क्षमता पुढच्या 2 वर्षात 20 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवरून नेणार असल्याचंही गडकरींनी यावेळी सांगितलं. नद्याजोड प्रकल्पासाठी 55 हजार कोटी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं गडकरी म्हणाले.

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीही उपस्थित होते. त्यांनी यावेळी राहुल गांधींना 5 हजार कोटीत कर्जमाफी करून दाखवण्याचं खुलं आव्हान दिलं. राहुल गांधींनी नांदेड सभेत राज्यात फक्त 5 हजार कोटींचीच कर्जमाफी झाल्याची टीका केली होती. तसंच आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याचा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

First published: September 8, 2017, 6:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading