तीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई

तीन युवक गोदावरी नदीत बुडाले; मृतांमध्ये एक पोलीस शिपाई

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर तेलंगणा राज्यातील कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील तीन युवकांचा नदीत बुडून मृत्यू झाला. मृत पावलेल्यांमध्ये एका पोलीस शिपायाचा समावेश आहे.

  • Share this:

गडचिरोली, 21 नोव्हेंबर : जिल्ह्याच्या सीमेवर तेलंगणा राज्यात असलेल्या कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील तीन युवकांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. रोहीत कडते (वय 23), महेंद्र पोरटे (वय 21) आणि अनिल कुडमेथे (वय 27) अशी या बुडून मृत पावलेल्या युवकांची नावे आहेत. यापैकी अनिल कुडमेथे हे वरोरा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यतर होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील 10 जण बुधवारी सकाळीच कालेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी निघाले होते. मंदिराजवळच गोदावरी नदीचं विस्तिर्ण पात्र आहे. दर्शन घेण्यापूर्वी आंघोळ करण्यासाठी म्हणून ते सर्वजण गोदावरी नदीत उतरले. दरम्यान, त्यापैकी रोहीत कडते, महेंद्र पोरटे आणि अनिल कुडमेथे हे तिघेजण जास्त खोल पाण्यात गेले आणि बुडाले. यातील अनिल कुडमेथे हे वरोरा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील ते रहिवासी असलेल्या या तिघांना शोधण्याचं काम सायंकाळपर्यंत सुरू होतं. त्यानंतर अंधार पडल्याने शोध मोहिम थंडावली. बचावपथकाद्वारे बुडालेल्या युवकांचा शोध घेतला जात आहे. मंदिर दर्शनासाठी गेलेल्या युवकांचा असा बुडून मृत्यू झाल्याची वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबियांवर आकाश कोसळलं. या दुर्देवी घटनेमुळे चिंतलधाबा गावावर शोककळा पसरली आहे.

 मत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार, VIDEO व्हायरल

First published: November 21, 2018, 8:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading