मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बदली झालेल्या शिक्षकाला निरोप द्यायला अवघं गाव लोटलं!

बदली झालेल्या शिक्षकाला निरोप द्यायला अवघं गाव लोटलं!

14 वर्षांपासून  शिक्षक असलेल्या विजय कारखेले यांची बदली झाली आणि त्यांना निरोप द्यायला सर्व गाव एकत्र आलं.

महेश तिवारी,गडचिरोली,ता.30 मे: गडचिरोली जिल्हयात नोकरीसाठी सहसा कुणी तयार होत नाही पण याला अपवाद ठरलेत अहमदनगर जिल्हयाचे विजय कारखेले हे शिक्षक. माओवादी, आदिवासी दुर्गम भागात तब्बल 14 वर्ष शिक्षक असलेल्या विजय कारखेले यांची बदली झाली आणि त्यांना निरोप द्यायला अवघं गाव लोटलं. नाचत, गात, नृत्य करत गावकऱ्यांनी गुरूजींनी जड अं:तकरणाने निरोप दिला.

गेली चौदा वर्षे गडचिरोली जिल्हयात अतिसंवेदनशील अशा गरंजी गावात विजय कारखेले शिक्षकासह मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत होते. गरंजीत आल्यानंतर त्यांनी सर्वांना एकत्र आणलं आणि गावाचा कायापालट केला. माओवाद्यांची दहशत असल्याने गावात याला कुणी तयार नव्हते.

मात्र विजय यांनी धाडस दाखवलं आणि कामाला सुरवात केली. वीज पुरवठयापासुन वंचित गावात श्रमदानाने वीज आणली. महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळवुन दिला. स्वखर्चातुन दहा घरात गॅस कनेक्शन्स मिळवुन दिली. गावात सामुहीक विवाह सोहळे घेतले. नागरिकांना पहिल्यांदाच जातीचं प्रमाणपञं मिळवुन दिलं.

विजय कारखेलेंची पुणे जिल्ह्यात बदली झाली आणि करंजीचे नागरिक नाराज झाले. पण त्यांनी विजय यांच्या आयुष्यभर लक्षात राहिल असा निरोप समारंभ केला. नाचत, नृत्यू करत आदिवासी परंपरेप्रमाणं त्यांनी निरोप दिला आणि विजय गावकऱ्यांच्या या निरपेक्ष प्रेमाणं भारावून गेले.

First published:

Tags: Gadchiroli, Teacher, आदिवासी, विकास, शिक्षक