मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी! 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश, अद्यापही गडचिरोलीत चकमक सुरूच

मोठी बातमी! 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश, अद्यापही गडचिरोलीत चकमक सुरूच

आताची सगळ्यात मोठी बातमी गडचिरोलीतून (Gadchiroli) समोर येते आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे.

गडचिरोली, 21 मे: आताची सगळ्यात मोठी बातमी गडचिरोलीतून (Gadchiroli) समोर येते आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. अद्यापही याठिकाणी सर्च ऑपरेशन आणि चकमक सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. दरम्यान तेरा माओवाद्यांना ठार करण्यात आल्याने, पोलिसांचं हे एक मोठं यश मानलं जात आहे. कारण कसनासूर चकमकीनंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. 2018 मध्ये 40 माओवादी कसनासूर चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर आज 13 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

गडचिरोली जिल्हयात महाराष्ट्र पोलिसांच्या सी सिक्स्टी कमांडो पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. सुरुवातीला आठ ते दहा नक्षलवाद्यांना ठार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र हा आकडा 13 वर गेला आहे. पैदीच्या जंगलात अजुनही चकमक सुरू आहे. घनदाट जंगल असणाऱ्या या परिसरात काल रात्रीपासून चकमक सुरू आहे.

एटापल्लीच्या जंगलातून नक्षलवाद्यांचे 6 मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. गडचिरोलीचे डीआईजी संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जणांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

First published: