गडचिरोली पोलीस दलात खळबळ, पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनचालकाची गोळी झाडून आत्महत्या

गडचिरोली पोलीस दलात खळबळ, पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनचालकाची गोळी झाडून आत्महत्या

मदन गौरकार यांनी मानेला रायफल लावली आणि गोळी झाडली. गोळी थेट डोक्यातून आरपार निघाली आणि यात त्यांचा मृत्यू झाला

  • Share this:

गडचिरोली, 07 जुलै : गडचिरोली  जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत उपविभागीय पोलीस अधिकारी (ऑपरेशन) ढोले यांचे वाहन चालक मदन गौरकार (47) यांनी कर्तव्यावर असताना स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना  घडली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मदन गौरकार हे मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी ढोले यांच्या निवासस्थानी ड्युटीवर हजर झाले होते.  त्यानंतर त्यांनी तिथे  सुरक्षेसाठी तैनात गार्डच्या मोर्चामध्ये गेले. यावेळी तिथे कुणीही हजर नव्हते. मदन गौरकार यांनी सुरक्षा गार्डची रायफल घेऊन स्वतःवर गोळी झाडली.

भर पावसात सुरू होते पोल दुरुस्तीचे काम,वायरमॅनचा अचानक गेला तोल आणि..,पाहा VIDEO

मदन गौरकार यांनी मानेला रायफल लावली आणि गोळी झाडली. गोळी थेट डोक्यातून आरपार निघाली आणि  यात त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षारक्षक जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा मदन गौरकार यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मदन यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

'तो मी नव्हेच', इंदुरीकर महाराजांनी तृप्ती देसाईंना दिले लेखी उत्तर

मदन गौरकार यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण कळू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

संपादन - सचिन साळवे

Published by: sachin Salve
First published: July 7, 2020, 1:22 PM IST

ताज्या बातम्या