पोलिसांच्या हालचालींची माहिती नक्षलवाद्यांना, सुरेंद्र गडलिंगबाबत धक्कादायक खुलासा

पोलिसांच्या हालचालींची माहिती नक्षलवाद्यांना, सुरेंद्र गडलिंगबाबत धक्कादायक खुलासा

सुरेंद्र गडलिंय यांनी नक्षलवादी कारवायांसाठी माहितीसोबतच पैसेही पुरवले असल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.

  • Share this:

पुणे, 9 मे : भीमा कोरेगाव प्रकरणानंतर चर्चेत आलेले वकील सुरेंद्र गडलिंग यांच्याबाबत पुणे पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. गडलिंग यांनी गडचिरोलीतील पोलिसांच्या हालचालींची माहिती बंदी असलेल्या नक्षलवादी संघटनांना पोहोचवली, असं पुणे पोलीसांनी न्यायालयात म्हटलं आहे.

सुरेंद्र गडलिंय यांनी नक्षलवादी कारवायांसाठी माहितीसोबतच पैसेही पुरवले असल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणानंतर शहरी नक्षलवाद पसरवण्याचा आरोप सुरेंद्र गडलिंग यांच्यासह अन्य काही लेखकांवर करण्यात आला होता.

माओवादी 'थिंक टँक' आणि भीमा कोरेगाव

माओवादी कनेक्शनच्या संशयावरून 28 ऑगस्ट 2018 रोजी पाच जणांना अटक करण्यात आली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे पोलिसांनी  देशभरात ठिकठिकाणी छापे मारून वरवर राव, अरूण परेरा, वर्णन गोन्सॅल्विस, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा या पाच जणांना अटक केली होती. पुण्यात 31 डिसेंबर 2017ला शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांनी पैसा पुरवल्याचा आरोप या पाचही जणांवर आहे.

यानंतर, पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉना विल्सन आणि प्राध्यापक शोमा सेन यांनाही अटक करण्यात आली  होती. या चौघांच्या 200 ई-मेलची तपासणी केली असता पुणे पोलिसांना अन्य काही जणांसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी करत पाच जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून माओवाद्यांसंदर्भातले कागदपत्रं मिळाल्याची माहिती समोर आली होती.

'या' पत्राच्या आधारे सुरेंद्र गडलिंग यांच्यावर शहरी नक्षलवादाचा आरोप

सुरेंद्र गडलिंग यांनी वरवरा राव यांना लिहिलेलं पत्र

कॉम्रेड वरवरा राव,

(माओवादी) साईबाबांच्या खटल्यामध्ये आपण अपयशी ठरलो कारण न्यायव्यवस्थेनं शत्रूशी हातमिळवणी केली आहे. नोटाबंदीमुळे आम्ही आमच्या गडचिरोली आणि छत्तीसगडमधल्या कॉम्रेड्सना पैसे पाठवू शकलेलो नाही. पण यात माझा दोष नाही. गेल्या 7-8 दिवसांपासून मी पैसे पाठवतो आहे. बस्तरमधल्या हल्ल्यामुळे देशाला आपली ताकद कळली आहे. केंद्र सरकार हादरून गेलं आहे.

मला आशा आहे की तुमच्या मार्गदर्शनाखाली आपले कॉम्रेड अशाच मोठा कारवाया करत राहतील. बस्तरमध्ये मोठा हल्ला करा हा तुमचा आदेश मी पोहोचवला आहे.

आपल्या कॉम्रेड्सच्या माहितीनुसार, उस्सूर, पामेद, एमलागुंडा, पलचल्मा, केरलालपालमध्ये हल्ला करणं सोपं जाईल. कारण या भागांमध्ये केंद्राचा फौजफाटा कमी असतो. कॉम्रेड साईबाबांच्या खटल्याबाबत जोरदार तयारी सुरू आहे. आम्ही राम जेठमलानींशीही बोललो आहे.

SPECIAL REPORT : 'मनसे फॅक्टर'मुळे नाशिकमध्ये पुन्हा इंजिन येईल ट्रॅकवर?

First published: May 9, 2019, 8:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading