मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Gadchiroli Nagar Panchayat: गडचिरोलीत तीन नगरपंचायतीवर काँग्रेसचा हात तर अवघ्या एका जागेवर भाजपचं कमळ फुललं

Gadchiroli Nagar Panchayat: गडचिरोलीत तीन नगरपंचायतीवर काँग्रेसचा हात तर अवघ्या एका जागेवर भाजपचं कमळ फुललं

गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक म्हणजेच तीन जागांवर स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक म्हणजेच तीन जागांवर स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक म्हणजेच तीन जागांवर स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.

गडचिरोली, 20 जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी (Gadchiroli 9 Nagar Panchayat Election Result) आज पार पडली. यामध्ये भामरागड (Bhamaragad), मुलचेरा (Mulchera), कोरची (Korchi), अहेरी (Aheri), सिरोंचा (Sironcha), एटापल्ली (Etapalli), चामोर्शी (Chamorshi), धानोरा (Dhanora) आणि कुरखेडा (Kurkheda) या 9 नगरपंचायतींचा समावेश आहे. यापैकी 3 नगरपंचायतींवर काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर भाजपला अवघ्या एकाच जागेवर बहुमत मिळवता आलं आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नऊ नगरपंचायतीची मतमोजणी पार पडली असून चामोर्शी आणि धानोरा नगरपंचायतीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सिरोंचा नगरपंचायतीत आदीवासी विद्यार्थी संघटनेला बहुमत मिळाले असुन कुरखेड्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय. मुलचेरा इथं राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना युतीला बहुमत मिळुन आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असून भाजप दुस-या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.

दरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात केलेल्या युतीच्या प्रयोगातुन शिवसेनेच्या जागा वाढल्या असुन गेल्या पाच वर्षापुर्वी केवळ एक जागेवर असलेल्या शिवसेनेचे यावेळी 14 सदस्य आणि सहा समर्थीत सदस्य निवडून आले आहेत.

वाचा : गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण प्रकरण,माजी सरपंचाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

काँग्रेसला एकहाती सत्ता मिळालेल्या नगरपंचायत

कोरची नगरपंचायत (Korchi Nagar Panchayat)

काँग्रेस - 8 जागांवर विजय

भाजप - 6 जागांवर विजय

अपक्ष - 2 जागांवर विजय

राष्ट्रवादी काँग्रेस - एका जागेवर विजय

शिवसेना - 0

एकूण जागा - 17

धानोरा नगरपंचायत (Dhanora Nagar Panchayat)

काँग्रेस - 13 जागांवर विजय

भाजप - 3 जागांवर विजय

राष्ट्रवादी काँग्रेस - 0

शिवसेना - 0

इतर - एका जागेवर विजय

एकूण जागा - 17

चामोर्शी नगरपंचायत (Chamorshi Nagar Panchayat)

काँग्रेस - 8 जागांवर विजय

राष्ट्रवादी काँग्रेस - 5 जागांवर विजय

भाजप - 3 जागांवर विजय

शिवसेना - 0

इतर - एका जागेवर विजय

एकूण जागा - 17

वाचा : गोवा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर; उत्पल पर्रिकरांना मोठा झटका

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडी

मुलचेरा नगरपंचायत (Mulchera Nagar Panchayat)

राष्ट्रवादी काँग्रेस - 7 जागांवर विजय

शिवसेना - 4 जागांवर विजय

इतर - 5 जागांवर विजय

भाजप - 1 जागेवर विजय

काँग्रेस - 0

एकूण जागा - 17

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता

कुरखेडा नगरपंचायत (Kurkheda Nagar Panchayat)

काँग्रेस - 8 जागांवर विजय

भाजप - 6 जागांवर विजय

इतर - 2 जागांवर विजय

राष्ट्रवादी काँग्रेस - एका जागेवर विजय

शिवसेना - 0

एकूण जागा - 17

वाचा : स्वर्णव भेटण्यापूर्वी काळानं गाठलं; भाच्याला भेटायला निघालेल्या आत्याचा मृत्यू

त्रिशंकू स्थिती

अहेरी नगरपंचायत (Aheri Nagar Panchayat)

भाजप - 6 जागांवर विजय

आदिवासी विद्यार्थी संघटना - 5 जागांवर विजय

राष्ट्रवादी काँग्रेस - 3 जागांवर विजय

शिवसेना - 2 जागांवर विजय

अपक्ष - एका जागेवर विजय

एकूण जागा - 17

गडचिरोलीच्या राजकारणाचं केंद्रबिंद असलेल्या अहेरी येथे धक्कादायक निकाल आला आहे. येथे भाजपने सहा जागा जिंकल्या असल्या तरी आदिवासी विद्यार्थी संघटनेने पाच जागा जिंकत सर्वांनाच अचंबित केले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव आत्राम आणि भाजपचे नेते अंब्रीशराव आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

भामरागड नगरपंचायत (Bhamragad Nagar Panchayat)

भाजप - 5 जागांवर विजय

इतर - 5 जागांवर विजय

राष्ट्रवादी काँग्रेस - 3 जागांवर विजय

काँग्रेस - 2 जागांवर विजय

शिवसेना - एका जागेवर विजय

एटापल्ली नगरपंचात (Etapalli Nagar Panchayat)

इतर - 6 जागांवर विजय

काँग्रेस - 5 जागांवर विजय

राष्ट्रवादी काँग्रेस - 3 जागांवर विजय

भाजप - 3 जागांवर विजय

शिवसेना - 0

अपक्षांच्या हाती सत्ता

सिरोंचा नगरपंचायत (Sironcha Nagar Panchayat)

अपक्ष - 10 जागांवर विजय

शिवसेना - 2 जागांवर विजय

राष्ट्रवादी काँग्रेस - 5 जागांवर विजय

काँग्रेस - 0

एकूण जागा - 17

First published:

Tags: BJP, Election, Gadchiroli, NCP, काँग्रेस