गडचिरोलीत माओवाद्यांकडून आणखी एका आदिवासीची हत्या, 6 दिवसातली चौथी घटना

गडचिरोलीत माओवाद्यांकडून आणखी एका आदिवासीची हत्या, 6 दिवसातली चौथी घटना

गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्याकडून हत्यासत्र सुरूच आहे.

  • Share this:

महेश तिवारी, प्रतिनिधी

गडचिरोली, 27 जानेवारी : गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्याकडून हत्यासत्र सुरूच आहे. रविवारी पहाटे पुन्हा एका निरपराध आदिवासी नागरिकाची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून हत्या केल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या ताळगुडा येथे उघडकीस आली आहे.  गेल्या सहा दिवसातील ही चौथी हत्या आहे.

सोनसाय तानु बेग (32) असं हत्या करण्यात आलेल्या इसमाचं नाव आहे. एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या ताळगुडा इथं शनिवारी मध्यरात्री माओवादी आले आणि सोनसाय तानु बेग यांची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून हत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

गेल्या सहा दिवसातील ही चौथी हत्या आहे. 22 जानेवारीला भामरागड तालुक्यातील कसनासुर येथील तीन नागरिकांची माओवाद्यांनी हत्या केली होती. मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू मासा कुडयेटी अशी हत्या झालेल्या ग्रामस्थांची नावे आहेत. हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह भामरागड-आल्लापल्ली मार्गावर फेकून दिले होते. आज परत ही हत्या झाल्याने दहशत पसरली आहे.

यासाठी केली हत्या...

माओवाद्यांनी तिघांच्या हत्येनंतर गावात बॅनर लावले आहेत. 21 एप्रिल 2018 रोजी कसनासूर येथे पोलिसांच्या सोबत झालेल्या चकमकीत 40 माओवादी ठार झाले होते. पोलिसांच्या या कारवाईत या तिघा ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. म्हणूनच त्यांची हत्या केल्याच बॅनरमध्ये म्हटले होते.

==========================

First published: January 27, 2019, 5:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading