गडचिरोली - चिमूर लोकसभा निवडणूक : माओवादग्रस्त भागात भाजपचा विजय?

गडचिरोली - चिमूर लोकसभा निवडणूक : माओवादग्रस्त भागात भाजपचा विजय?

गडचिरोलीमध्ये भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे नामदेव उसंडी निवडणूक लढवत आहेत. या माओवादग्रस्त भागात भाजप पुन्हा विजय मिळवणार का ? हा प्रश्न आहे.

  • Share this:

गडचिरोली, 15 मे : गडचिरोलीमध्ये भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे नामदेव उसेंडी निवडणूक लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षानेही इथे उमेदवार उतरवले आहेत.पण खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे.

गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघ आदिवासीबहुल आहे. हा भाग माओवादग्रस्तही आहे. इथे मतदान झाल्यानंतर 1 मे ला महाराष्ट्र दिनीच माओवाद्यांनी कुरखेडामध्ये केलेल्या हल्ल्यात 15 जवान शहीद झाले तर गाडीचा चालकही मृत्युमुखी पडला.

माओवाद्यांचा हल्ला

माओवाद्यांनी सी -60 कमांडोंच्या पथकावर हल्ला केला. या कमांडोंच्या वाहनाच्या मार्गात माओवाद्यांनी भूसुरुंग पेरून ठेवले होते. या स्फोटात या जवानांच्या गाडीचा अक्षरश: चुराडा झाला. अशा हल्ल्यांमुळे इथे सुरक्षेचं मोठं आव्हान असतं. माओवाद्यांची दहशत असूनही गडचिरोलीमध्ये नेहमीच चांगलं मतदान होतं. यावेळीही इथे मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गडचिरोली चिमूर मतदारसंघावर पहिल्यापासून काँग्रेसचं वर्चस्व होतं पण 1998 मध्ये भाजपला इथे पहिल्यांदा विजय मिळाला. यानंतर ही जागा कधी भाजपकडे होती तर कधी काँग्रेसकडे होती.

2014 लोकसभा निवडणूक

मागच्या निवडणुकीत भाजपचे अशोक नेते यांना 5 लाख 35 हजार982 मतं मिळाली तर नामदेव उसेंडी यांना 2 लाख 99 हजार 112 मतं मिळाली. अशोक नेते यांनी नामदेव उसेंडी यांचा दणदणीत पराभव केला होता. यावेळी मात्र अशोक नेते आपली जागा राखणार का याची चर्चा आहे.

गडचिरोली चिमूरमध्ये आमगाव, आरमोरी, अहेरी, गडचिरोली आणि चिमूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी ब्रह्मपुरी सोडलं तर बाकीच्या पाच जागांवर भाजपचं वर्चस्व आहे. ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे.

====================================================================

ममतादीदी, हा मोदी तुम्हाला घाबरत नाही, कोलकात्यातून UNCUT भाषण

First published: May 15, 2019, 7:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading