कुरखेडा भुसुरुंगस्फोट प्रकरणात राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक

कुरखेडा भुसुरुंगस्फोट प्रकरणात राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक

1 मे रोजी झालेल्या भुसुरुंगस्फोटात 15 पोलीस शहीद झाले होते. या घटनेत अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आलीय.

  • Share this:

गडचिरोली 5 जुलै : कुरखेडा भुसुरुंगस्फोटाच्या प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी राष्ट्रवादी कांग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक केलीय.  1 मे  रोजी झालेल्या भुसुरुंगस्फोटात 15 पोलीस शहीद झाले होते. या घटनेत अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आलीय. कुरखेडा येथील कैलास रामचंदानी असं त्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. राष्ट्रवादी कांग्रेसचा तालुका अध्यक्ष होता असं सांगितलं जातंय.

कैलास रामचंदानी एक वर्षापुर्वी तालुका अध्यक्ष होता माञ त्याला निष्क्रीयतेच्या कारणांवरुन पदावरुन काही महिन्यापूर्वी  काढण्यात आलं होतं असा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार धर्मराव बाबा आञाम यांनी 'न्युज 18 लोकमत'शी  बोलताना केलाय.

VIDEO- बॉल पूलमध्ये फसली Sushmita Sen, बॉयफ्रेंड रोहमन शॉलने अशी केली

काय झालं होतं 1 मे रोजी?

गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात 15 जवानांसह एक चालक शहीद झाला. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोलीमधील लोकल एरिया कमिटीने हा हल्ला घडवून आणला होता. यासाठी IDचा वापर आहे.

फाशी घेताना दोरी तुटल्याने वाचला जीव, कारंजा शहरातील घटना

महाराष्ट्र दिनीच दिवशीच गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूळखेडा गावाजवळील ही घटना घडली. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'नेटवर्क 18 लोकमत'शी संवाद साधताना दिली आहे. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

First published: July 5, 2019, 11:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading