मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शासकीय कार्यालयातील लॅपटॉप आणि संगणक चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

शासकीय कार्यालयातील लॅपटॉप आणि संगणक चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी करणाऱ्या टोळीला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी करणाऱ्या टोळीला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी करणाऱ्या टोळीला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे.

गडचिरोली, 28 फेब्रुवारी : गडचिरोली, गोंदिया, आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यातील विविध गावातील शासकीय व खाजगी कार्यालय फोडून लॅपटॉप, संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर आणि काही महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी करणाऱ्या टोळीला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे. संगणक, प्रिंटर आणि प्रोजेक्टर चोरी गेल्याची तक्रार तक्रारकर्त्यांनी आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये केली होती. या गंभीर बाबींची आरमोरी पोलिसांनी दखल घेऊन या गुन्ह्याचा तपास करणे सुरू केले. सदर प्रकरणातील आरोपीवर गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर नजीकच्या चंद्रपूर ,गोंदीया या जिल्ह्यातील गावात संगणक ,प्रिंटर ,लॅपटॉप चोरीचे जवळपास 15 ते 20 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल होते. आरमोरी पोलिसांनी मानवी बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा परिणामकरित्या वापर करून  यातील प्रमुख आरोपी विकास शर्मा याला भंडारा येथून अटक करुन इतर आरोपींना  अटक करण्यात  पोलिसांना यश मिळाले. विविध ठिकाणावरून लॅपटॉप, प्रिंटर, प्रोजेक्टर, संगणक संच, डीजे संच, संगणकाचे सामान, मॉनिटर, मायक्रोस्कोप अशा अनेक वस्तू चोरल्याची आणि 12 गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. आरमोरी पोलिसांनी आरोपींकडून  लॅपटॉप,  प्रिंटर,  प्रोजेक्टर, संगणक संच,डीजे संच, मॉनिटर,मायक्रोस्कोप असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Gadchiroli

पुढील बातम्या