शहीद तौसिफ शेख यांना अखेरचा निरोप, पापाss पापाss म्हणत दीड वर्षीय जहेदचा आक्रोश

शहीद तौसिफ शेख यांना अखेरचा निरोप, पापाss पापाss म्हणत दीड वर्षीय जहेदचा आक्रोश

तौसिफ शेख अमर रहे..अमर रहे.. अमर रहे..च्या घोषणा देत गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद तौसिफ शेख यांच्या पार्थिवावर पाटोदा येथे शासकीय इतमामात मुस्लिम धर्माच्या विधीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • Share this:

बीड, 3 मे- तौसिफ शेख अमर रहे..अमर रहे.. अमर रहे..च्या घोषणा देत गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद तौसिफ शेख यांच्या पार्थिवावर पाटोदा येथे शासकीय इतमामात मुस्लिम धर्माच्या विधीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. पापाss पापाss म्हणत दीड वर्षीय जहेद याने वडिलांसाठी प्रचंड आक्रोश केला. तौसिफ यांची पत्नी सिबा, मोठा मुलगा मोहम्मद यांची अवस्था पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा आपोआप ओलावल्या होत्या..

शहीद तौसिफ शेख यांची अंत्ययात्रेला सकाळी 8.30 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघाली. यावेळी पाटोदा शहरासह जिल्हा भरातून लोक सहभागी झाले होते. नक्षलवाद मुर्दाबाद..मुर्दाबादच्या घोषणा देत शहीद तौसिफच्या बलिदानाचा बदला घ्या, नक्षलवाद समूळ नष्ट करा, अशी मागणी करण्यात आली. अंत्ययात्रेत सर्व धर्मीय महिला-पुरुष सहभागी झाले होते.

अमर रहे..तौसिफ शेख अमर रहे..च्या घोषणा देत साश्रुनयनांनी मुस्लिम विधीप्रमाणे वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला. तौसिफ यांच्या जाण्याने पाटोदा शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज पाटोदा बंद ठेवून दुखवटा पाळण्यात येत आहे. शहरातील व शेजारी सर्वजण तौसिफ यांच्या आठवणीने गहिवरले होते. उपस्थित नागरिकांनी शहीद तौसिफ यांच्या कुटुंबीयांचे सात्वंन करण्यात आले.

तौसिफ यांच्या क्रांतीनगर भागातील घरापासून सकाळी अंत्ययात्रा निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजमहंमद चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पुढे ग्रामीण रुग्णालय समोरील भूमी अभिलेख कार्यालय समोरील मांजरसुंबा रोडवरील शासकीय जागेवर अखेरचा निरोप देण्यात आले.

यावेळी स्थनिक नेते जिल्हापरिषद अध्यक्षा सविता गोल्हर, आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार साहेबराव दरेकर, रमेश पोकळे, उपस्थिती होते. पोलीस दलातील पोलीस अधीक्षक जी.श्रीधार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थनिक नेते उपस्थित होते.

VIDEO: शहीद जवान तौसिफ शेख यांना अखेरचा निरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2019 01:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading