महेश तिवारी, गडचिरोली 29 जुलै : माओवाद्यांच्या विरोधातल्या C-60 कमांडोंना आज मोठं यश मिळालं. या पथकाची आणि महिला माओवाद्यांच्या दलमची आज चकमक उडाली. गरंजीच्या जंगलात ही चकमक उडाली. त्यात एक महिला माओवादी ठार झाली तर पाच जणी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. प्रचंड पाऊस सुरू असतानाच कमांडोंनी ही थरारक कारवाई केली. पोलिसांनी घनदाट जंगलातून शस्त्रसाठाही जप्त केलाय. कमांडोंचं अजुनही कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
धक्कादायक : दुष्काळामुळे मराठवाड्यातून मुंबईत आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
असा कॅम्प उद्ध्वस्त केला
काही दिवसांपूर्वीच C-60 कमांडोंनी माओवाद्यांचा एक कॅम्प उद्ध्वस्त केला होता. गडचिरोली जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र माओवाद्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. कुंडूमच्या जंगलात गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा ट्रेनिंग कॅम्प उध्वस्त केला. यावेळी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यात काही माओवादी ठार झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली. हे माओवादी घातपाती हल्ल्याच्या तयारीत होते. याची माहिती पोलिसांच्या विशेष दलाला मिळाली होती त्यानंतर विशेष ऑपरेशन राबवत पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी घनदाट जंगलात असलेल्या कॅम्पमधून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा, स्फोटकं आणि प्राचाराचं साहित्य जप्त केलं. या भागात पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली आहे.
नवलखांचा संबंध 'हिजबुल मुजाहिद्दीन'शी
भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील आरोपी आणि माओवादी विचारवंत गौतम नवलखा यांचा पाकिस्तानातील दहशतवादी संघटना 'हिजबुल मुजाहिद्दीन'शी थेट संबंध आहे, असा खळबळजनक आरोप राज्य सरकारच्या वकील अरुणा पै यांनी बुधवारी (24 जुलै) मुंबई हायकोर्टात केला आहे. याशिवाय गौतम नवलखा सन 2011 ते 2014 दरम्यान हे काश्मीरमधील फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी आणि शकील बख्शी यांच्या संपर्कात होते, अशी माहितीही अरुणा पै यांनी कोर्टात दिली. भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेवरून हे प्रकरण उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटच्या आधारे अरुणा पै यांनी हे आरोप केले आहेत.