मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आधी उपचारासाठी धावाधाव..मृत्यूनंतर दिला खांदा, संकटकाळात मुस्लीम बांधव आले मदतीला

आधी उपचारासाठी धावाधाव..मृत्यूनंतर दिला खांदा, संकटकाळात मुस्लीम बांधव आले मदतीला

महिलेच्या उपचारासाठी धावाधाव करण्यापासून ते दुर्वैवी निधन झाल्यानंतर हिंदू पद्धतीने अत्यंविधी करण्यापर्यंत...मुस्लीम बांधव पुढे सरसावले.

महिलेच्या उपचारासाठी धावाधाव करण्यापासून ते दुर्वैवी निधन झाल्यानंतर हिंदू पद्धतीने अत्यंविधी करण्यापर्यंत...मुस्लीम बांधव पुढे सरसावले.

महिलेच्या उपचारासाठी धावाधाव करण्यापासून ते दुर्वैवी निधन झाल्यानंतर हिंदू पद्धतीने अत्यंविधी करण्यापर्यंत...मुस्लीम बांधव पुढे सरसावले.

कल्याण, 3 मे : धर्म कोणताही असो त्याचं मूळ माणुसकीशी जोडलेलं असतं. काहीवेळा दोन धर्मांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण प्रत्येक वेळी माणुसकी नावाचा धर्म हा प्रयत्न हाणून पाडतो. असंच काहीसं उदाहरण कल्याणमध्ये पाहायला मिळालं. मुलं दुसऱ्या शहरात असताना अचानक आईची प्रकृती खालावली आणि या परिस्थितीत माणुसकी जागवली ती मुस्लीम बांधवांनी. त्या महिलेच्या उपचारासाठी धावाधाव करण्यापासून ते दुर्वैवी निधन झाल्यानंतर हिंदू पद्धतीने अत्यंविधी करण्यापर्यंत...हे बांधव पुढे सरसावले. कल्याण पश्चिम येथे राहणाऱ्या प्रभा कलवार या 70 वर्षीय महिला आपल्या दोन मुलांसह कल्याण पश्चिम भोई वाडा येथे राहतात. त्यांची दोन मुले परदेशात असून एक मुलगा नाशिक येथे कामानिमित्त स्थायिक झाला आहे. त्याआधी ते रोहिदास वाडा येथे वास्तव्यास होते. काल रात्री प्रभा याना अचानक त्रास होऊ लागला. त्यांच्या मुलाने रोहिदास वाडा येथील आपले जुने शेजारी असलेले शाकिर शेख यांना फोनवर सांगितले. शाकिर यांनी त्यांचे मित्र तौसिफ बागवान, पप्पू शेख, सलमान शेख, इम्रान शेख, करमुद्दीन शेख, फारीख बीजापूर आदिना घेऊन थेट प्रभा राहत असलेले घर गाठले. परिस्थिती पाहून त्यांनी तात्काळ रिक्षा बोलावून प्रभा याना रिक्षाने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यानंतर प्रभा यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे कसे? असा प्रश्न त्यांच्या मुलांसमोर उभा ठाकला. त्यांनी नाशिक येथून त्यांच्या मोठ्या मुलाला बोलावून घेतले. हेही वाचा - मुंबई-पुण्यातून गावी जाण्याच्या तयारीत असणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा शाकिर शेख व त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेत आपण अंत्यविधी करू असे सांगत एका हिंदू मित्राकडून अंत्यविधी कसा करतात हे जाणून घेतले आणि प्रभा यांचा मृतदेह कल्याण रोहिदास वाडा येथील त्यांच्या जुन्या घरी नेऊन तिथे अंत्यविधीची तयारी करून कल्याण पश्चिम बैलबाजार येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेनिमित्त शहरात हिंदू मुस्लीम ऐक्याचे एक सुंदर उदाहरण समोर आले असून एका हिंदू व्यक्तीच्या पार्थिवाला मुस्लीम बांधवांनी खांदा देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Kalyan

पुढील बातम्या