हातात राष्ट्रध्वज घेऊन 2 वर्षाच्या चिमुकल्याने वडिलांच्या चितेला दिला मुखाग्नी...

देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना अंगावर वीज पडून वीरमरण आलेले नांदगाव तालुक्यातील कर्ही येथील मल्हारी लहरे या लष्करी जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 03:10 PM IST

हातात राष्ट्रध्वज घेऊन 2 वर्षाच्या चिमुकल्याने वडिलांच्या चितेला दिला मुखाग्नी...

बब्बू शेख,(प्रतिनिधी)

नांदगाव, 8 सप्टेंबर: देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना अंगावर वीज पडून वीरमरण आलेले नांदगाव तालुक्यातील कर्ही येथील मल्हारी लहरे या लष्करी जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हातात राष्ट्रध्वज घेऊन 2 वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या वडिलांच्या चितेला मुखाग्नी दिला. हे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. लाडक्या भूमिपूत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी शासकीय अधिकारी, लष्करी अधिकारी व जवानांसह पंचक्रोशीतील जनसागर लोटला होता. यावेळी 'भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम', या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

मल्हारी लहरे हे गुजरातच्या जामनगर येथे लष्कारात कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना लाहिरे यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता. शनिवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव कर्ही (ता. नांदगाव) येथे आणण्यात आले.

मल्हारी खंडेराव लहरे यांचा जन्म मनमाडपासून जवळ असलेल्या कर्ही या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला होता. लहानपणापासून देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. डिसेंबर 2012 मध्ये ते लष्करात दाखल झाले. गुजरात राज्यातील जामनगर येथील एडीआरटीच्या युनिटमध्ये शस्त्रगाराच्या सुरक्षेत ते कार्यरत होते. एका उंच जागी कर्तव्य बजावत असताना त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. मल्हारी लहरे यांच्या लग्नाला जेमतेम 4 वर्षे झाली असून त्यांना अवघ्या 2 वर्षाचा मुलगा आहे. वयोवृद्ध आई-वडील व भाऊ, बहीण आहेत.

Loading...

सुटी न मिळाल्याने पत्नी व मुलाला घेतले होते बोलवून...

गेल्या काही महिन्यांपासून या जवानाने सुटी मागितली होती. मात्र, सुटी न मिळाल्याने त्यांनी अखेर पत्नी व मुलाला जामनगर येथे बोलवून घेतले होते. पत्नी आणि मुलगा आल्यावर रविवारी सर्वजण फॅमिली क्वार्टरला शिफ्ट झाले होते. लग्नानंतर पत्नी आणि मुलांसोबत पहिल्यादांच त्यांना युनिटमध्ये क्वार्टर मिळाले होते. पण, कुटुंबासोबतच्या फक्त 5 व्या दिवशी कर्तव्यावर असताना वीज पडून मल्हारी यांना वीरमरण आले. रात्री त्याचा पार्थिव गावी आणल्यानंतर सकाळी त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हातात राष्ट्रीय ध्वज घेऊन 2 वर्षाच्या चिमुकल्याने वडिलांच्या चितेला मुखाग्नी दिला. मन हेलावून टाकणारे हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. अंत्यविधीला विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, लष्करी अधिकारी व जवान यांच्यासह पंचक्रोशीतील जनसमुदाय लोटला होता.

VIDEO: बोलता येत नाही, ऐकूही येत नाही, विद्यार्थिनीनं अशी अनोख्या पद्धतीने दिली गणेशवंदना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2019 03:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...