मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मरणानंतरही सुटका नाही, अंत्यसंस्कार करावा लागत आहे रस्त्याच्या कडेला!

मरणानंतरही सुटका नाही, अंत्यसंस्कार करावा लागत आहे रस्त्याच्या कडेला!

एकविसाव्या शतकातही ही भयानक वास्तविकता खेडी खुर्द गावात पाहायला मिळत असून अंत्यसंस्कारासाठी मात्र आजही मृतांची अवहेलना होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  sachin Salve

एरंडोल, 28 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून स्मशानभूमीपासून गाव वंचित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे मृतदेहावर रस्त्याच्या बाजूला अंत्यसंस्कार करावे लागत आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या खेडी खुर्द गावात स्मशान भूमी मिळावी यासाठी ग्रामस्थांच्या वतीने शासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र तरी देखील या ग्रामस्थांना अद्याप पर्यंत न्याय मिळालेला नाही.एकविसाव्या शतकातही ही भयानक वास्तविकता खेडी खुर्द गावात पाहायला मिळत असून अंत्यसंस्कारासाठी मात्र आजही मृतांची अवहेलना होत आहे.

(कोल्हापूर हादरलं! पत्नीसह 2 मुलांची हत्या करून स्वतःच पोलिसांत हजर झाला पती)

गावात कित्येक वर्षापासून स्मशानभूमी नसल्याने गावात कोणी मृत झाल्यास रस्त्यावर मिळेल त्या जागेवर ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे मृत्यूनंतरही संघर्ष पाहायला मिळत आहे.शासनाच्या वतीने अनेक वर्षानंतर आता कुठे स्मशानभूमीचा जागेचा प्रस्ताव मान्य केला आहे. मात्र शासनाच्या वतीने ठरवण्यात आलेल्या जागेसाठी ही अनेक भानगडी असल्याने स्मशानभूमीसाठी मात्र ग्रामस्थांना जागा मिळत नाही हे दुर्दैव आहे.

(अवघ्या 6 सेकंदाच चांदणी चौकातील पूल होणार जमिनदोस्त; 2 ऑक्टोबरला मध्यरात्री करणार ब्लास्ट)

आता तरी शासनाने स्मशानभूमीसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देऊन व स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करून मृतांची होणारी अवहेलना थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

First published: