मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लोकनेता हरपला, पतंगराव कदम अनंतात विलीन

लोकनेता हरपला, पतंगराव कदम अनंतात विलीन

 ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर  मुळगावी वांगी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर मुळगावी वांगी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर मुळगावी वांगी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

 

10 मार्च : : ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर  मुळगावी वांगी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा विश्वजित कदम यांनी पतंगराव कदमांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

हरहुन्नरी, स्पष्ट, फटकळ, रांगड्या स्वभावाचे, शिक्षण, सहकार,राजकारण, समाजकारण या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेले लोकनेते पतंगराव कदम यांचं दीर्घ आजारानी शुक्रवारी निधन झालं. आज सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. सिंहगड बंगल्यात सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, प्रणिती शिंदे, कुमार सप्तर्षी,विश्वनाथ कराड,सुधीर गाडगीळ या मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन पतंगराव यांचा मुलगा विश्वजित याचं सांत्वन केलं. त्यांनंतर फुलाने सजलेल्या ट्रकमधून पतंगराव कदम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.

त्यानंतर पतंगराव कदमांचं पार्थिव निवासस्थानापासून धनकवडी येथील भारती विद्यापीठ येथे सजवलेल्या ट्रक मधून आणण्यात आलं. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी त्यांचं पार्थिव सांगलीतील मुळ गावी वांगी इथं आणण्यात आलं.

मुळगावी वांगी इथं पतंगराव कदम यांच्यावर शासकीय इतमामात अंतसंस्कार करण्यात आले. मुलगा विश्वजित कदम यांने पार्थिवाला मुखाग्नी दिला.

पतंगराव कदमांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, बबनराव पाचपुते, मंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, विनय कोरे, जयंत पाटील, सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, अशोक चव्हाण, चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आदी नेते उपस्थितीत होते.

First published:

Tags: Patangrao kadam, Political career, Vikhe patil, पतंगराव कदम, मृत्यू, राजकीय प्रवास, राधकृष्ण विखे पाटील