• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • हेलिकॉप्टर बनविणाऱ्या फुलसावंगीच्या रँचोचा मृत्यू; अपघाताचा धक्कादायक VIDEO आला समोर

हेलिकॉप्टर बनविणाऱ्या फुलसावंगीच्या रँचोचा मृत्यू; अपघाताचा धक्कादायक VIDEO आला समोर

जमिनीवर इंजिन सुरू केले इंजिन 750 एम्पियर वर फिरत होते सर्व व्यवस्थित सुरू होते पण अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि अपघात झाला.

  • Share this:
यवतमाळ, 11 ऑगस्ट : यवतमाळ जिल्ह्याच्या (Yavatmal) महागाव तालुक्यातील फुलसावंगी (Fulsavangi) येथील रँचोचा अपघाती मृत्यू (Fulsavangi Rancho dies in accident) झाला आहे. शेख इस्माईल शेख इब्राहिम वय 24 वर्ष याने चक्क हेलिकॉप्टर बनविले होते. तर मागील 2 वर्षांपासून इस्माईल हा हेलिकॉप्टर बनविण्यासाठी कष्ट घेत होता हळू हळूहळू त्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. मात्र ट्रायल घेत असतानाच या रँचोचा मृत्यू झाला. इस्माईल हा पत्राकारागिर होता त्याला एक भाऊ आणि एक बहीण आहे. मोठा भाऊ मुस्सवीर हा गॅस वेल्डर आहे तर वडील घरीच असतात. इस्माईल हा शेख इब्राहिम यांचा दुसऱ्या नंबरचा मुलगा घरची परिस्थिती जेमतेम. इस्माईल हा पत्रकारागिर असल्याने तो अलमारी कुलर असे विविध उपकरणे बनवायचा. इस्माईल हा फक्त 8 वी पर्यंत शिकलेला. पण एक दिवस त्याला असे काही सुचले की त्याने चक्क हेलिकॉप्टर बनवायचे ठरवले आणि त्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रवास सुरु झाला. हळूहळू एक एक पार्ट तयार करू लागला आणि 2 वर्षाच्या प्रयत्नानंतर 11 ऑगस्टला त्याचे स्वप्न पूर्ण होणार होते आणि 10 ऑगस्टच्या रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घेण्यास सुरुवात केली. दरड कोसळून मोठी दुर्घटना; ढिगाऱ्याखाली 80 नागरिक अडकल्याची भीती जमिनीवर इंजिन सुरू केले इंजिन 750 एम्पियर वर फिरत होते सर्व व्यवस्थित सुरू होते पण अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि त्यामुळे मुख्य फॅनला येऊन धडकला. त्यानंतर तो फॅन इस्माईलच्या डोक्यात लागला आणि पाहता पाहता सर्व स्वप्न भंग झाले आणि डोक्यावर फॅन लागल्याने इस्माईलचा जागीच मृत्यू झाला. त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो त्याच्या आणि त्याच्या गावाला जगापर्यंत नाव पोहोचवायचे. पण इस्माईलचे स्वप्न अर्धवटच राहिले आणि या रँचोचा ट्रायल दरम्यान मृत्यू झाला. इस्माईलचे स्वप्न होते की, समाजातील गरीब लोकांसाठी काही तरी वेगळं करावं. त्यासाठी त्याचे प्रयत्न ही सुरू होते. या धेय्य वेढा तरुणाने हेलिकॉप्टर तयार केले. मात्र शेवटी ते उडविण्याच्या प्रयत्नात असतांना हेलिकॉप्टरचा अपघात झाला. त्याचा या अपघाताचे मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:Sunil Desale
First published: