सगल दहाव्या दिवशीही इंधन दरांमध्ये वाढ, हे आहेत आजचे भाव

सगल दहाव्या दिवशीही इंधन दरांमध्ये वाढ, हे आहेत आजचे भाव

इंधन दरवाढीमध्ये दिलासा मिळणं तर दूरच पण सलग 10व्या दिवशी दरवाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 29 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत आता पेट्रोल 84 रुपये 99 पैशांवर गेलंय. तर डिझेलच्या दरामध्ये 27 पैशांनी वाढ झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : इंधन दरवाढीमध्ये दिलासा मिळणं तर दूरच पण सलग 10व्या दिवशी दरवाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 29 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत आता पेट्रोल 84 रुपये 99 पैशांवर गेलंय. तर डिझेलच्या दरामध्ये 27 पैशांनी वाढ झाली आहे.

मुंबईत एक लीटर डिझेलसाठी 72 रुपये 48 पैसे मोजावे लागतायेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढत्या किमती आणि सरकारकडून कर कमी न होणे, ही यामागची प्रमुख कारणं आहेत.

फक्त भारतातच नाही, तर ब्राझिलमध्येही इंधन दरवाढीविरोधात तीव्र नाराजी आहे.. ब्राझिलमध्ये काल हजारो ट्रक चालकांनी महामार्गांवर ट्रक उभे करून महागड्या डिझेलचा विरोध केलाय. यामुळे माल पोहचवण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ब्राझिलचं चलन डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाल्यानंही तिथल्या इंधनदरात वाढ झालीये.

पाहूयात आज कोणत्या शहरात पेट्रोलचा काय दर आहे ते...

शहर                 पेट्रोल         डिझेल

- मुंबई               84.99        72.48

- पुणे                 84.71         71.39

- कोल्हापूर        85.10         71.73

- रत्नागिरी          85.92        72.57

- नाशिक           85.36       72.02

दहा दिवसात असे बदलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिवस              दर              वाढ

14 मे            82.65           0.17

15 मे            82.79           0.14

16 मे            82.94           0.15

17 मे            83.16            0.22

18 मे           83.45            0.29

19 मे           83.75            0.30

20 मे          84.07            0.32

21 मे           84.40            0.33

22 मे           84.70            0.30

23 मे           84.99            0.29

पाहूयात या दरवाढीमागची नेमकी कारणं काय आहेत ते...

- आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागलं

- पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती

- सौदी अरेबिया आणि इराणमधले मतभेद टोकाला

- अमेरिकेनं इस्रायलमधला दूतावास जेरुसलेमला हलवला

- सीरियावरून अमेरिका, रशियातला तणाव वाढला

- सौदी अरेबियाकडून तेलाची निर्मिती कमी

- भारत सरकारकडून तेलावरच्या करात कपात नाही

 

First published: May 23, 2018, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading