संतापजनक प्रकार! शेकडो लोकांसमोर वृद्ध पुराच्या पाण्यात गेले वाहून; तरुण मंडळी मात्र VIDEO काढण्यात व्यग्र

संतापजनक प्रकार! शेकडो लोकांसमोर वृद्ध पुराच्या पाण्यात गेले वाहून; तरुण मंडळी मात्र VIDEO काढण्यात व्यग्र

शेतातून शेळ्या चारून 65 वर्षीय विठ्ठल धोंडीबा माने घराकडे जात होते.

  • Share this:

नांदेड, 13 जून : तंत्रज्ञानाने माणसातील माणुसकी हिरावून घेतली की काय, अशी शंका नांदेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर निर्माण होत आहे. नांदेड येथे नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यातुन जातांना एक वृद्ध व्यक्ती वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पण त्याला वाचवण्याऐवजी गावकरी त्याचा व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते. मागील दोन-तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

त्यातही ग्रामीण भागात पावसाचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक खेड्या-पाड्यातील नाले ओसंडून वाहत आहेत. नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यात देखील शनिवारी मोठा पाऊस झाला. तालुक्यातील मुक्रमाबद सर्कलमधील खतगाव येथील नाल्याला पूर आला होता. या नाल्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू होता. याचवेळी गावातील 65 वर्षीय विठ्ठल धोंडीबा माने या ठिकाणी आले. शेतातून शेळ्या चारून ते घराकडे जात होते. पुलावरून पाणी वाहत असतांना विठ्ठल माने काठी टेकवत पुलावरून जाऊ लागले. यावेळी नाल्याच्या दोन्ही बाजूने शेकडो लोक जमले होते.

हे ही वाचा-रस्त्यावर बसलेल्या गर्भवती गायीवर चढवला ट्रॅक्टर; धक्कादायक VIDEO पाहून हादराल!

पण त्यांना कोणीही थांबवलं नाही. पाण्याचा प्रवाह जास्त होता. तरीही वृद्ध विठ्ठल माने पुढे पुढे जात होते. काही क्षणानंतर तोल जाऊन ते खाली पडले आणि पुराच्या पाण्यात वाहून गेले. ते जात असतांना अनेक गावकरी त्यांचे मोबाइलमध्ये शूटिंग काढत होते. पण त्यांना थांबवण्याचा किंवा ते वाहून जातांना त्यांना वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. रविवारी सकाळी गावाजवळच्या तळ्याकाठी त्यांचा मृतदेह आढळला. पावसाळ्यात अशा अनेक घटना ग्रामीण भागात घडत असतात. विशेष करून जनावरे वाहून गेल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडल्या. तेव्हा गावकऱ्यांनी पूर आल्यावर सावध असायला हवं. कोणतीही जीवित हानी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. खतगावातील ही घटना दुर्दैवी आहे. पुलाजवळ थांबलेल्या गावकऱ्यांनी वृद्ध व्यक्ती विठ्ठल माने यांना पुलावरून जाण्यास मज्जाव केला असता तर निश्चितच त्यांचा जीव वाचला असता. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला.

Published by: Meenal Gangurde
First published: June 13, 2021, 7:34 PM IST

ताज्या बातम्या