Home /News /maharashtra /

9 वर्षांपासून शिवनेरीवरुन शिवज्योत सांगवी गावात नेणारा मावळा समीर शेख

9 वर्षांपासून शिवनेरीवरुन शिवज्योत सांगवी गावात नेणारा मावळा समीर शेख

(Photo Credit - एबीपी माझा)

(Photo Credit - एबीपी माझा)

आजच्या घडीला महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान प्रत्येकाचा मनात दिसून येतो. त्यातच बीडमधील शिवप्रेमी असलेल्या समीर शेख नावाचा तरुणाची एक आगळीवेगळी कहाणी आहे.

    पुणे, 19 फेब्रुवारी: आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती आहे. आज अखंड महाराष्ट्रासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहानं साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. आजच्या घडीला महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान प्रत्येकाचा मनात दिसून येतो. त्यातच बीडमधील शिवप्रेमी असलेल्या समीर शेख नावाचा तरुणाची एक आगळीवेगळी कहाणी आहे. गेल्या 9 वर्षांपासून बीडमधील समीर शेख नावाचा तरुण शिवनेरी किल्ल्यावरुन शिवज्योत आपल्या आष्टी मधल्या सांगवी पाटण या गावी घेऊन जातोय. एबीपी माझानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. शिवजयंतीच्या एक दिवस आधी समीर शेख 50 तरुणांनी सोबत घेऊन शिवनेरीवर पोहोचले. त्यानंतर आता शिवनेरी किल्ल्यावरुन शिवज्योत पेटवून 200 किलोमीटरचा प्रवास करुन समीर शेख आपल्या गावी सांगवी पाटण येथे पोहोचत आहेत. शिवजयंतीचा महोत्सव येताच समीर शेख यांचं गाव असलेल्या सांगवी पाटण येथील घरावर भगवी पताका डोलताना दिसते. यावर बोलताना समीर शेख सांगतात की, दिवाळी आणि ईदला घरामधये सगळीकडे जसा आनंद पाहायला मिळतो तसाच आनंद शिवजयंतीलाही आमच्या घरात असतो. गेल्या 9 पासून दरवर्षी समीर शेख आपल्या मित्रांसोबत शिवनेरी किल्ल्यावर जातात. तिथे शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर असलेली शिवज्योत ते आपल्या गावी घेईन येतात आणि त्यानंतर आपल्या गावात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतात.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Beed, Pune

    पुढील बातम्या