खासदार साहेब धन्यवाद, UPSC परीक्षेमुळे अडकलेले 1600 मराठी विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार

खासदार साहेब धन्यवाद, UPSC परीक्षेमुळे अडकलेले 1600 मराठी विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार

दिल्लीतील अडकलेल्या या मराठी मुलांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं प्रयत्न केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेल्या आणि लॉकडॉऊनमुळे अडकलेल्या 1600 मराठी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे मंत्रालयानं या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परतण्यासाठी दिल्ली ते भुसावळ या विशेष ट्रेनच्या प्रवासाला मान्यता दिली आहे.

दिल्लीतील अडकलेल्या या मराठी मुलांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं प्रयत्न केलं. परतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि वास्तव्यास असणाऱ्या ठिकाणी रुग्ण वाढल्यान भयभीत झालेल्या या सर्व मुलांसमवेत काल पुन्हा झूम व्हिडिओ काँफेरेन्सद्वारे संवाद डॉ शिंदे यांनी संवाद साधला होता.

15 दिवसांची चिमुकली झाली पोरकी, तरुण वयातच पोलीस कॉन्स्टेबलने केली आत्महत्या

येत्या शनिवारी, 16 मे रोजी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्टेशनवर ही विशेष ट्रेन धावणार असून रविवार 17 मे रोजी भुसावळ स्टेशन इथे पोहोचणार आहे. दरम्यानच्या प्रवासात ट्रेन महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांना इच्छितस्थळी स्टेशनवर उतरण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

ठाण्यात आज मध्यरात्रीपासून होणार मोठा बदल, हे विभाग होणार पूर्णत: बंद

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुणे, कल्याण आदी स्टेशनवर देखील ट्रेनला थांबा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून याची अधिकृत माहिती मंळवारपर्यंत जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाता येणार असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सरकारचे आणि शिंदे यांचे आभार मानले आहे. तर या सगळ्या प्रवासा सोशल डिस्टंसिंगचं पालन केलं जाईल असा विश्वास प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Monsoon 2020 आला रे! या तारखेला देशात होणार आगमन, हवामान खात्याचा अंदाज

संपादन - रेणुका धायबर

First published: May 11, 2020, 11:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading