देव तारी त्याला कोण मारी; 25 फुटावरून कार कोसळली पण...

देव तारी त्याला कोण मारी; 25 फुटावरून कार कोसळली पण...

वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलावरून 25 फूट खोल दरीत कोसळली.

  • Share this:

राजेश भागवत, जळगाव, 28 ऑगस्ट : देव तारी त्याला कोण मारी', अशी म्हण प्रचलित आहे. याच म्हणीचा प्रत्यय आणणारी एक घटना आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या पिंप्री गावाजवळ घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून थेट 25 फूट खोल असलेल्या दरीत कोसळली. सुदैवाने या अपघातात कार चालक बचावला आणि एक मोठा अनर्थ टळला.

पारोळा ते जळगाव दरम्यान असलेल्या पिंप्री गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एक पूल आहे. या पुलाखाली 25 फूट खोल दरी आहे. दुपारी 12 वाजताच्या सुमारास धुळ्याकडून जळगाव जिल्ह्यातील फैजपुरला एक कार जात होती. कार चालकाच्या समोरच्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलावरून 25 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने या अपघातात कार चालक बचावला. मात्र, या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं.

आम्ही काही भिकाऱ्याची अवलाद नाही, राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून लहान मोठे अपघात होत आहेत. यासंदर्भात वाहन चालकांकडून सातत्याने ओरड होत असली तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केलं जातय.

तरुणाची दगडाने ठेचून हत्या

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे दगडाने ठेचून  एका तरूणाची हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय. या घटनेनं परिसरात खळबळ उडालीय.  रुपेश जगतराव वाल्हे असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. आज सकाळी नदीपात्रात रूपेश चा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. शिक्रापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. रूपेशवर पुणे जिल्ह्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिलीय. मात्र या हत्येचं नेमकं कारण अजुनही गुलदस्त्यात आहे.

मुख्यमंत्र्यांमध्ये मला विरोधी पक्षनेता दिसतो, थोरातांचा पलटवार

वयक्तिक संघर्षातून ही हत्या झाली का याचा तपास पोलीस करत आहेत. आर्थिक वाद आणि गुंडांमधल्या वर्चस्वाचा संघर्ष यातून ही हत्या झाल्याचा अंदाजही व्यक्त होतोय. घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी एक खास टीम तयार केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 06:29 PM IST

ताज्या बातम्या