Home /News /maharashtra /

अमरावतीत मालगाडीला भीषण अपघात; रुळावरून डब्बे घसरल्यानं वाहतुकीवर परिणाम

अमरावतीत मालगाडीला भीषण अपघात; रुळावरून डब्बे घसरल्यानं वाहतुकीवर परिणाम

दर्याबाद याठिकाणी अपघातग्रस्त झालेली मालगाडी... (फोटो-साम टीव्ही)

दर्याबाद याठिकाणी अपघातग्रस्त झालेली मालगाडी... (फोटो-साम टीव्ही)

Railway Accident in Amravati: अमरावती जिल्ह्यातील दर्याबाद याठिकाणी मालगाडीला भीषण अपघात (freight train accident) झाल्याची घटना समोर आली आहे.

    अमरावती, 15 ऑगस्ट: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील दर्याबाद याठिकाणी मालगाडीला भीषण अपघात (freight train accident) झाल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री दीड ते दोनच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्थानकावरून (Badnera railway station) नरखेडच्या दिशेनं जाणाऱ्या मालगाडीला हा अपघात झाला आहे. रात्री अपरात्री अपघात झाल्यानं वाहतूक सुरळीत करण्यात अनेक अडचणी येत होत्या. परिणामी या लोहमार्गावरून होणारी वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. मालगाडीचे डब्बे रुळावरून हटवण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. साम टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित मालगाडी कोळसा घेऊन बडनेरा रेल्वे स्थानकावरून नरखेडच्या दिशेनं जात होती. दरम्यान दर्याबाद याठिकाणी अचानक या मालगाडीचे काही डब्बे रुळावरून घसरले (derailment of coaches) आहेत. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे. रात्री उशीरा या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचाव कार्य करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. हेही वाचा- मुंबईत नवविवाहितेला बसनं चिरडलं; भरपाई म्हणून पतीला मिळणार 55 लाख रात्री उशीरापर्यंत याठिकाणी रुळावरून डब्बे हटवण्याच काम सुरू होतं. विशेष म्हणजे या मार्गावर रेल्वेगाड्यांची फार मोठ्या प्रमाणात वाहतूक नसल्यामुळे वाहतूकीवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र, नरखेड भुसावळ पेसेंजर (Narkhed Bhusawal Passenger) काही तास उशिरा धावण्याची शक्यता आहे. हेही वाचा-हेलिकॉप्टर बनविण्याऱ्या फुलसावंगीच्या रँचोचा अपघाती मृत्यू रेल्वे रुळावरून घसरलेले मालगाडीचे डब्बे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण काही डब्यांचे चाकं निखळून पडल्यानं अनेक अडचणी येत आहेत. रेल्वे विभागाच्या पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ही घटना समोर आल्यानंतर आसपासच्या लोकांनी घटनास्थळी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Amravati, Railway accident

    पुढील बातम्या