मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कॉलेजच्या मैदानात दोन तरुणींची फ्री स्टाइल मारामारी, नाशिकमधला VIDEO व्हायरल

कॉलेजच्या मैदानात दोन तरुणींची फ्री स्टाइल मारामारी, नाशिकमधला VIDEO व्हायरल

नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील नामांकित कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे.

नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील नामांकित कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे.

नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील नामांकित कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे.

नाशिक, 30 डिसेंबर : शाळा-महाविद्यालयांमध्ये तरुणांमध्ये राडा होणे हे काही नवीन राहिले नाही. पण, नाशिकमध्ये (nashik) कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून भर मैदानात दोन तरुणींची फ्री स्टाइल (girl Freestyle fight) हाणामारी पाहण्यास मिळाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral) झाला आहे.

नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील नामांकित कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. दुपारच्या सुमारास कॉलेजच्या मैदानावर दोन तरुणींमध्ये कुठल्या तरी कारणावरून बाचाबाची झाली. दोन्ही तरुणींमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. बघता बघता दोघींमध्ये मारामारी सुरू झाली. यावेळी या दोन्ही तरुणींच्या काही मैत्रिणीही घटनास्थळावर हजर होत्या. पण दोन्ही तरुणींमध्ये फ्री स्टाइल हाणामारी सुरू झाली.

दोघींनी एकमेकांना चापटा आणि लाथा मारल्या. त्यानंतर एकमेकांचे केस धरून ओढताण सुरू होती. वाद विकोपाला गेला हे लक्षात आल्यावर त्यांच्या मैत्रिणींनी मध्यस्थी केली आणि दोघींना बाजूंना नेलं. या मुली कोणत्या कारणावरून भांडत होत्या हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही.

(जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा भर बैठकीत ऊर्जा मंत्र्यांवर संताप, नेमकं काय घडलं?)

गमंत म्हणजे, मैदानावर तरुणाचा मोठा घोळका जमा झाला होता. पण, यातून कुणीही या तरुणींची भांडण सोडवण्यासाठी पुढं आलं नाही. तरुण शिट्या आणि टाळ्या वाजत या भांडणाचा आनंद घेत होते. तर काही महाभाग आपल्या मोबाइलमध्ये हे भांडण कैद करत होते.

मुलींची हाणामारी बघण्यासाठी कॉलेज परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. परंतु, या घटनेबद्दल महाविद्यालय प्रशासनाने मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे  महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये असलेल्या शिस्ती बाबत आणि बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

First published:
top videos