बीड, 10 मे : शेतातील नाली खोदण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बीडमध्ये (Beed) घडली आहे. तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात (kej Police station) गेले असता पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन्ही गटात फ्री स्टाइल (Freestyle fight) हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बीडच्या केज तालुक्यातील उमरी इथं ही घटना घडली आहे. केजच्या उमरी इथे भाउराव चाळक आणि शेख अली अकबर यांच्या शेजारी जमिनी आहेत. यावेळी शेतातील जुन्या भांडणाची कुरापत काढून नाली खोदण्याच्या वादावरून दोन्ही गट परस्परांशी भिडले.
शेतातील नाली खोदण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला होता. शेतातच दोन्ही गटात बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये दगड-विटा आणि लाठ्या काठ्याची तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. या घटनेत एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे.
त्यानंतर दोन्ही गट एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पण दोन्ही गट पुन्हा पोलीस ठाण्याच्या आवारातच भिडले. दोन्ही गटांनी एकमेकांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली तसंच दगडफेक सुद्धा केली.
'माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा..;' एकतर्फी प्रेमातून शरीरसुखाची मागणी
पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी हस्तक्षेप करून भांडणं सोडवली. दरम्यान, याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.