स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा पत्नीने थेट राष्ट्रपतींकडे मागितली देह त्यागाची परवानगी
स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा पत्नीने थेट राष्ट्रपतींकडे मागितली देह त्यागाची परवानगी
बनावट दस्तऐवज तयार करून मद्य विक्रीचा परवाना परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याने बीडमधील (beed) स्वातंत्र्यसैनिकाच्या 89 वर्षीय विधवा पत्नीने थेट राष्ट्रपतींकडे..
बनावट दस्तऐवज तयार करून मद्य विक्रीचा परवाना परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याने बीडमधील (beed) स्वातंत्र्यसैनिकाच्या 89 वर्षीय विधवा पत्नीने थेट राष्ट्रपतींकडे..
बीड, 28 मे : बनावट दस्तऐवज तयार करून मद्य विक्रीचा परवाना परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याने बीडमधील (beed) स्वातंत्र्यसैनिकाच्या 89 वर्षीय विधवा पत्नीने थेट राष्ट्रपतींकडे (President) देह त्यागाची परवानगी मागितली आहे. याबाबत पीडित सत्यभामा शिंदे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे.
बीडच्या सत्यभामा शिंदे माणसांतल्या विकृती राक्षसी वृत्तीने आणि प्रशासनाने डोळ्यादेखत केलेली फसवणूक पाहून त्यांना अश्रू अनावर होत आहे. सत्यभामा यांचे पती हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना विविध प्रमाणपत्रांनी गौरवण्यात देखील आलंय. स्वातंत्र्यानंतर रंगनाथ शिंदे यांना उदरनिर्वाहासाठी त्याकाळी मद्य विक्रीचा परवाना देण्यात आला. आष्टी येथे त्यांचा व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र सत्यभामा यांच्या पतीच्या निधनानंतर काही जणांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरत बनावट कागदपत्रे तयार केली आणि परस्पर दुकान परवाना नावे केला.
(मनसेचा पार पडला मेळावा, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले नवे आदेश)
सत्यभामा यांनी अनेक शासकीय कार्यालयाची उंबरे झिजविली. न्याय तर सोडाच परंतु पदरी निराशाच मिळाली. आता त्या प्रचंड थकल्या आहेत. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी सत्यभामा शिंदे यांनी केली. वेळोवेळी प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून देखील न्याय मिळत नसल्याने अखेर 90 वर्षीय सत्यभामा शिंदे यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून देह त्यागाची परवानगी मागितली आहे.
(अत्यंत बिभत्स प्रकार, घरासमोरील भयंकर दृश्य पाहून थरकाप उडेल, प्रकरण CCTVत कैद)
राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी देहत्यागाची मागणी केली आहे. मात्र यावर अद्याप कोणाचेही उत्तर मिळाले नाही. स्वातंत्र्य लढ्यात संपूर्ण आयुष्य झिजविणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा पत्नीला स्वातंत्र्य भारतात आणि पुरोगामी महाराष्ट्रात देहत्यागाची मागणी करावी लागतेय हे प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सणसणीत चपराक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.