विजय देसाई, प्रतिनिधी
वसई, 25 फेब्रुवारी : पतीपासून अलीकडेच विभक्त झालेल्या पत्नीच्या घरच्यांना सोसायटीत घुसून फ्री स्टाईल हाणामारी केल्याची घटना वसईत घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाणीमध्ये ४ जण जखमी झाले असून २ जणांवर वसईच्या गोल्डन पार्क रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात दोघांनी एकमेका विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
वसई पश्चिमेकडे ‘डीमार्ट’जवळ असलेल्या पेरियार सोसायटीत सुप्रिया जयस्वाल ही महिला २ मुलांसह राहते. सुप्रिया जस्वाल पतीसोबत झालेल्या कौटुंबिक वादामुळे आपल्या आई वडिलांकडे राहत होत्या. सोमवारी रात्री साडे दहावाजताच्या सुमारास सुप्रिया यांचे पती आणि त्यांच्या सासरकडील मंडळी तिच्या वडिलांच्या घरी आले. त्यानंतर सुप्रिया आणि त्यांच्या भावांना सासरच्या व्यक्तींनी बेदम मारहाण केली.
वसई : घटस्फोट झाल्यानंतर नवऱ्याने पत्नीच्या घरी जाऊन भाऊ वडिलांनी केली मारहाण pic.twitter.com/UvFKehhQHF
— News18Lokmat (@News18lokmat) February 25, 2020
सुप्रिया यांच्यासह त्यांचे दोन भाऊ आणि वडील हाणामारीत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वसईच्या गोल्डनपार्क हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घरात घुसून ही मारामारी होतानाचा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनं काही वेळ सोसायटीच्या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी वसई पोलिसांनी दोघांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हे दाखल केले असून पुढील तपास करीत आहेत.
गुंडांच्या हाणामारीचा भयानक VIDEO, थेट कुटुंबियांवरच चालवल्या तलवारी
दरम्यान, जुलूस घेऊन जात असणाऱ्या कुटुंबावर शनिवारी रात्री उशिरा काही अज्ञातांना हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यात मश्गुल असणाऱ्या या कुटुंबावर लक्ष्मण अहिरवार आणि त्यांच्या नातेवाईकांवर काही गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी जुलूसमधील वस्तूंची तोडफोड केली. या प्रकरणी मोती नगर पोलीस स्थानकाचे प्रभारी सतीश सिंह यांनी मुख्य आरोपी सोनू घोसी यांच्यासह अन्य अज्ञात हल्ला करणाऱ्या काही तरुणांना अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
मातोनगर परिसरात गुंड सोनी घोसी आणि त्यांच्या काही साथीदारानी जुलूसवर तलवारी आणि काठीने हल्ला केला. सोनी घोसीचं नाव दारू माफियांसोबतही जोडलं जातं. मध्य प्रदेशातील सागर शहरात शनिवारी रात्री अनुसूचित जातीच्या एका कुटुंबावर जुलूसदरम्यान हा हल्ला करण्यात आला. हल्ल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
A birthday procession carried out by a Dalit family was allegedly attacked by a group of men armed with swords and rods in Sagar. @ndtvindia @AunindyoC @manishndtv @OfficeOfKNath @ChouhanShivraj #RubikaLiyaquat #MathematicianSwara #SwaraBhasker #ShaheenBaghProtest #Jaffrabad pic.twitter.com/aU0NOhH6VP
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) February 23, 2020
हेही वाचा-'ट्रम्प यांच्या जाण्यानंतर आम्ही ऐकणार नाही' भाजप नेत्याचा पोलिसांना अल्टिमेटम
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं तोडफोड आणि या कुटुंबावर हल्ला केला गेला आहे ते. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सोनी घोसीसह त्याच्या साथीदारांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. काही आठवड्यांपूर्वी सागर जिल्ह्यात एका अनुसूचित जातीच्या युवकाची जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती. धन प्रसाद याच्या हत्येचा आरोप अल्पसंख्यांक असलेल्या समुदायावर करण्यात आला होता. त्यामुळे जातीतून हा वाद उफाळला का? त्यातून शनिवारी पुन्हा हल्ला करण्यात आला का? या दोन्ही हल्ल्याचा एकमेकांसोबत काही संबंध आहे का? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.