...म्हणून गाव गड्या आपलं चांगलं, गावकऱ्यांचा उपक्रम पाहून तुम्ही म्हणाला 'वा शाब्बास'!

...म्हणून गाव गड्या आपलं चांगलं, गावकऱ्यांचा उपक्रम पाहून तुम्ही म्हणाला 'वा शाब्बास'!

लॉकडाउनमध्ये तब्बल 56 दिवसांपासून असेच नवनवीन जेवणाचे बेत या गावात होत आहे.

  • Share this:

बीड, 18 मे : कोरोना व्हायरसच्या संकटात शहर हतबल झाली. मात्र, गावच गावपण अबाधित आहे. गावातील एकही पोट उपाशी राहू नये याची काळजी घेणारी माणुसकी खेड्यातच पाहायला मिळाली आहे.

बीड जिल्ह्यातील मंझरी हवेली गावातील वडाच्या झाडाखाली सोशल डिस्टन्सिंग पाळून पंगतीला बसलेले आबाल वृद्ध गावकरी...त्यांच्या ताटामध्ये साजूक तुपातील बुंदी वाढणारे तरुण मुलं, त्याच्या जोडीला पुरी भाजी, पुलाव राईस हे पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटेल. हा बेत काही कार्यक्रमाचा नाही. पण लॉकडाउनमध्ये तब्बल 56 दिवसांपासून असेच नवनवीन जेवणाचे बेत या गावात होत आहे.

हेही वाचा -कोरोनाचा उद्रेक वाढल्याने मंगळवारपासून पुण्याचं पूर्ण मार्केट बंद राहणार

याच कारण ही तसंच आहे, गावातील एकही पोट उपाशी राहू नये म्हणून गावातील तरुण मुलं आणि सरपंच यांनी एकत्रित येत हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी गावातील महिला मंडळांनी चविष्ट जेवण बनवण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे गावातील हातावर पोट असणाऱ्या मजूर गरजू, वयोवृद्धचा प्रश्न सुटला आहे, असं गावचे पाटील शेषराव डोंगर यांनी सांगितलंय.

'शहरातील लोकांचे जेवणाचे हाल टीव्हीवर पाहिले आणि माझ्या गावातील कोणीही उपाशी राहू नये म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला. त्यात तरुण आणि तरुणीचीही साथ लाभली', असं सरपंच अंबादास गुजर यांनी आत्मविश्वासाने सांगितलं.

काम-धंदे बंद आहेत म्हणून परिस्थिती अवघड झाली आहे. मात्र, गावात जेवणाचा प्रश्न मिटला आहे, नवनवी पदार्थ खायला आहेत, असं गावकरी सांगत आहेत.

हेही वाचा -कुणाच्या डोळ्यात पाणी तर चिमुरडे भुकेने व्याकुळ, हृदय पिळवटून टाकणारे PHOTO

गावातील एकही पोट उपाशी राहू नये, यासाठी काळजी घेणारे बीड जिल्ह्यातील मंजरी हवेली हे गाव गावची लोकसंख्या 3000 इतकी आहे.  या गावातील लोकं शहरात मजुरी करून किंवा भाजीपाला विकून पोट भरतात. मात्र, लॉकडाऊनमुळे काम नाही ही अडचण लक्षात घेता गावातली तरुणांनी व सरपंचाच्या पुढाकारातून गेल्या 56 दिवसांपासून गावात अन्नदानाचा यज्ञ अविरत सुरू आहे.

यात सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेची खबरदारी घेतली जात आहे. या छोट्या गावचा आदर्श इतर लोकांनी घेतला तर कोरोना संकटता कुणीही उपाशी पोटी राहणार नाही.

संपादन - सचिन साळवे

First published: May 18, 2020, 5:18 PM IST

ताज्या बातम्या